Download App

Sushma Andhare ; एमआयडीसीतून बाप-लेकांनी भंगार विकून खाल्लं

Sushma Andhare on Bharat Gogawale: एमआयडीसीतून बाप-लेकांनी सगळं भंगार विकून खाल्लं आहे. भंगार विकून खाल्लेल्या लोकांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. एमआयडीसीतून बाप 10 टक्क्यांनी घेतो तर पोरगं कामाच्या अगोदर 7 टक्के आणि काम झाल्यावर 7 टक्के असा 14 टक्क्यांचा भाव चालला आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी महाडच्या जाहीर सभेतून शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्यावर केला.

‘आपना एक स्टाईल है, इलाका तुम्हारा और धमाका हमारा..’ भरत गोगावले यांच्यावर मी महाराष्ट्रात कुठेही बोलले नाही पण त्यांच्या इलाक्यात घुसून बोलले पाहिजे. नेता कोण असतो जो पुढं नेतो. पण शेठ कोण असतो? जो व्याज व्यवहार करतो, जनतेची लूट करतो, लुबाडून खातो तो शेठ असतो. पन्नास खोक्यातून चिकार लटू करणारी लोकं, लबाड्या करणारी ही लोकं आहेत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी भरत गोगावले यांच्यावर केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार गडगडणार? पवारांनी स्पष्टच सांगितलं

मुंबईच्या वज्रसभेत मांडलेले मुद्दे आणि त्यामागील आमची भूमिका आम्ही सोडणार नाही. अदानींचे 20 हजार कोटी कुठुन आले? हा प्रश्न सातत्याने भाजपाला विचारावा लागलं. कारण ह्या प्रश्नाला ते बजरंग बली, जय श्रीराम अशा गोष्टींकडे नेवून ठेवत आहेत. जेव्हा भाजप महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा अशा आघाड्यांवर अपयशी ठरते त्यावेळी ते महापुरुषांच्या फोटोंच्या आड जाऊन लपतात. कधी सावरकारांच्या फोटोंच्या आड लपतात तर कधी धर्माच्या आड लपतात. तर कधी बजंरगबलीच्या आड लपतात कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखे मुद्दे नसतात, असा हल्लोबोल सुषमा अंधारे यांनी भाजपवर केला आहे.

Tags

follow us