Download App

‘ती’ अजितदादांची तक्रार नव्हतीच, भाजपभक्तांनी संधी शोधण्याचं कारण नाही; सुषमा अंधारेंचा पलटवार

Sushma Andhare On BJP : एकतर कालचा कार्यक्रम हा अराजकीय होता. कालचा कार्यक्रम घरगुती होता. त्या अराजकीय कार्यक्रमात भटक्या विमुक्ताची गेली अनेक वर्ष सल्लागार म्हणून शरद पवार काम करत आहेत. त्यामुळे कालचा कार्यक्रम घरगुती गोतावळ्यातला कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये आपली कैफियत आपल्या माणसांच्या समोर मांडली पाहिजे आणि आपल्या कुटूंब प्रमुखाने ती ऐकली पाहिजे, एवढाच त्याचा हेतू होता.

Maharashtra Politics : निश्चिंत राहा! आम्ही सर्व कायदेशीर केलंय; काही तासातचं…

एकतर सामान्य तळागाळातून आलेल्या माणसांना संधी मिळत नाही आणि जेव्हा संधी मिळते, त्यावेळी त्यांच्यावर संघटीत आणि संस्थात्मक हल्ले होतात. असे हल्ले होत असताना एका सुरक्षेची गरज असते. ती पूर्ण झाली पाहिजे, ही भूमिका सांगतानाची होती असेही यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, ज्यावेळी माझ्याबद्दल एक अभद्र टिप्पणी होते, तेव्हा विरोधी बाकावर बसलेल्या व्यक्तींनी आवाज उठवला पाहिजे. वेगवेगळ्या सभांमधून वेगवेगळे पक्षप्रमुख असतील, खासदार संजय राऊत असतील, आदित्य ठाकरे असतील, त्यांनी आपल्या भूमिका परखडपणे मांडलेल्या आहेत.

महिला आयोगाची नोटीसही यासंबंधी निघाली होती. पुढे मात्र काय झालं माहित नाही. विरोधकांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करावा अशी माझी मागणी होती, आहे. कारण मी सभागृहात नाही, असंही यावेळी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.

काल बोलताना केलेली टिप्पणी ही अजित दादांची तक्रार नव्हती, कारण विधानसभेत जर अजितदादा नेते असतील तर विधानपरिषदेमध्ये आमचे अंबादास दानवे आहेत. विधानपरिषदेच्या उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे आहेत. या सर्वांकडून अपेक्षा असते. मी फक्त माझ्याबद्दलच नाही तर कोणाबद्दलही टिपण्णी झाली तर त्यावर बोललं गेलं पाहिजे.

एकीकडे म्हात्रे प्रकरणामध्ये अनेक तरुणांना जेलमध्ये टाकण्यात आले. मात्र मुख्यमंत्री महोदय म्हणतात की, त्याची चौकशी करु, कुठलीतरी एक सदस्याची समिती नेमली आहे, ते कोण पोलीस अधिकारी आहेत ते मला काही समजलं नाही असंही त्या यावेळी म्हणाल्या. त्या अधिकाऱ्याने चौकशी केली का नाही मला माहित नाही. मलाही चौकशीसाठी बोलवलं नाही.

मला असं वाटतं की, विरोधकांइतकंच सत्ताधारीसुद्धा राज्यातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व, राष्ट्रीय पातळीवरचं व्यक्तिमत्व या अर्थानं पवार साहेबांकडे वेगवेगळ्या बाबी मांडत असतात, अगदी मागच्या काही दिवसांपूर्वी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतसुद्धा रिफायनरीबाबत पवार साहेबांना भेटायला गेले होते. तर मला वाटतं की माझी कैफियत भटक्या विमुक्तांच्या संघटनेचे सल्लागार म्हणून ती पवार साहेबांसमोर मांडली.

ती मांडताना सभागृहातील सर्वच लोकांनी यावर बोललं पाहिजे, हे अपेक्षीत आहे, त्याच्यात सगळेच जण आले. आत्ता अगदी आपल्यासोबत बोलण्याच्या अगोदर मला आमदार वैभव नाईक यांचा फोन आला, ते म्हणाले हो आमची चूक आहे, आम्हीपण आवाज उठवला पाहिजे. ते बोललं पाहिजे त्यामुळे कोणा एकाला बोलण्याचं काही कारण नाही, त्यामुळे भाजपभक्तांनी त्याच्यात काही संधी शोधण्याचं कारण नाही, असा टोलाही यावेळी सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

Tags

follow us