Download App

Sushma Andhare : ..तर अमृता फडणवीस प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; अंधारेंचे प्रत्युत्तर

Image Credit: Sushma Andhare 

Sushma Andhare : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी गठीत केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी या प्रकरणी देत अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करायची असेल तर जरूर करा. पण, न्यायमूर्ती लोया आणि अनिक्षा जयसिंगानी, अमृता फडणवीस प्रकरणातही एसआयटी गठीत करावी, अशी मागणी अंधारे यांनी केली.

अंधारे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात त्या म्हणतात, की सीबीआयने दिशा सालियान प्रकरणी अपघाती मृत्यू असा निर्वाळा दिल्यानंतर ही एसआयटी नेमायची असेल तर नक्की नेमा. कर नाही त्याला डर कसली. पण सोबतच एक-एक एसआयटी जज लोया आणि अनिक्षा जयसिंगानी, अमृता फडणवीस या प्रकरणातही नेमली जावी एवढी माफक अपेक्षा आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

ललित पाटील ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट; सुषमा अंधारे यांना नाशिकमधून निनावी पत्र..

Tags

follow us

वेब स्टोरीज