Sushma Andhare : सध्या मुंबईत राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session) सुरू आहे. पण, हे अधिवेशन सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काल अचानक दिल्लीत गेले होते. त्यांची ही दिल्लीवारी गुप्त होती. आज सकाळी याबाबतची माहिती समोर आली. अशातच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी खासदार श्रीकांत शिंदेंना (Shrikant Shinde) आयकर विभागाकडून नोटीस मिळाल्याचं विधान केलं. त्यामुळेच शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी यांनीही शिंदेच्या या दौऱ्यामागे आयकर विभागाच्या नोटीसीचा तर काही संदर्भ नाही ना, असा संशय व्यक्त केला.
‘तो माझा जीव घेणार होता, मी फक्त…’; शिंदे-फडणवीसांचं नाव घेताच गायकवाडांचा मुलाखतीतून काढता पाय
तसेच सरडा धोका बघून बदलतो, माणूस मोका बघून रंग बदलो, पण मोक्यापेक्षा आयकर विभागाचा धोका मोठा असल्याचा टोलाही अंधारेंनी शिंदेंना लगावला.
रंग बदलणाऱ्या सरड्यामध्ये आणि माणसांमध्ये एवढ्याच फरक आहे;
सरडा “धोका” बघून रंग बदलतो..
माणूस “मोका” बघून रंग बदलतो..
गुरुपौर्णिमेचा “मोका” असला म्हणून काय झालं, आयकर विभागाच्या नोटीशीचा “धोका” त्यापेक्षा मोठा आहे..!!
दिघे साहेब बघताय ना..?@ShivsenaUBTComm#रंगबदलू— SushmaTai Andhare (@andharesushama) July 10, 2025
उपमुख्यमंत्री शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर जाऊन आले. शिंदे यांनी त्यांचा दिल्ली दौरा गुप्तपणे आटोपला. या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. हा दौरा नेमका कशासाठी होता, हे कळू शकले नव्हते. त्यातच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केलं. आपल्याला आयकर विभागाची नोटीस आली आहे. त्याचसोबत श्रीकांत शिंदे यांनाही आयकर विभागाची नोटीस आल्याचं शिरसाट म्हणाले. त्यानंतर त्यांनी यावरून यु टर्न घेतला आणि श्रीकांत शिंदेंच नाव चुकून घेतल्याचं म्हटलं.
बोलण्याच्या ओघात शिंदेंच्या दिल्लीवारीचं गुपित शिरसाटांनी फोडलं; गदारोळ होताच….
त्यानंतर सुषमा अंधारेंनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटलं की, रंग बदलणाऱ्या सरड्यामध्ये आणि माणसांमध्ये एवढ्याच फरक आहे; सरडा ‘धोका’ बघून रंग बदलतो.. माणूस ‘मोका’ बघून रंग बदलतो.. गुरुपौर्णिमेचा ‘मोका’ असला म्हणून काय झालं, आयकर विभागाच्या नोटीशीचा ‘धोका’ त्यापेक्षा मोठा आहे..!! दिघे साहेब बघताय ना..?, असं अधारेंनी म्हटलं.
दरम्यान, सुषमा अंधारेंच्या टीकेल आता शिंदे गट काय प्रत्युत्तर देतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.
सत्ताधारी शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांविरुद्ध आयकर विभागाकडून सातत्याने सुरू असलेल्या कारवाईमुळे महायुतीमध्ये अंतर्गत गटबाजी असल्याचं दिसंत.