बोलण्याच्या ओघात शिंदेंच्या दिल्लीवारीचं गुपित शिरसाटांनी फोडलं; गदारोळ होताच….

Shrikant Shinde : मला आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस आली असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आज दिली होती. मंत्री शिरसाट (Shrikant Shinde) यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र शिरसाट यांनी आपले वक्तव्य मागे घेत आपल्या तोंडी वाक्य घातलं गेलं असं स्पष्टीकरण दिले आहे.
तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पवासाळी अधिवेन सुरु असताना काल रात्री अचानक दिल्लात गेले होते मात्र शिंदे दिल्लीला का गेले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. माहितीनुसार, दिल्लीत शिंदे यांनी भाजपाच्या काही मोठ्या नेत्यांशी आणि काही केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आहे. तर आज माध्यमांशी बोलताना मंत्री शिरसाट यांनी श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस आली असल्याची माहिती देत काही वेळाने आपलं वक्तव्य मागे घेत स्पष्टीकरण दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
मंत्री शिरसाट यांनी आपलं वक्तव्य मागे घेतल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधक चारही बाजूने टीका करत आहे. यातच मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी या प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी एक्स वर I T ची नोटीस, म्हणून दिल्ली वारी ? असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
तर दुसरीकडे माध्यमांना स्पष्टीकरण देत मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, मला आयकर विभागाची नोटीस आली आहे. मला काही पत्रकारांनी विचारलं श्रीकांत शिंदेनासुद्धा नोटीस आली आहे का? यावर मी प्रतिक्रिया देत म्हटलो की, श्रीकांत शिंदेंना सुद्धा जरी नोटीस आली असेल तर मला माहित नाही, श्रीकांत शिंदे यांना नोटीस आली की नाही हे मला माहित नाही, हे वाक्य माझ्या तोंडी घातलं गेलं असं माध्यमांशी बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले.
आईचा प्रेरणादायक प्रवास दिसणार; सुपर डान्सरच्या यंदाच्या सीझनमध्ये होणार धमाका
नेमकं काय म्हणाले होते संजय शिरसाट?
माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले होते की, आयकर विभाग प्रत्येकाची तपासणी करत असतो. मला नोटीस आली आहे, श्रीकांत शिंदे साहेबांना नोटीस आली आहे. आणखी कोणाला नोटीस येत असेल त्यामुळे आयकर विभागाला उत्तर द्यायला बांधील आहोत. मला 9 तारखेला उत्तर द्यायला सांगितले आहे. असं संजय शिरसाट म्हणाले होते.