Sushma Andhare VS Sheetal Mhatre : भोंदूबाबा अशोक खरातच्या (Ashok Kharat) प्रकरणावरून शिवसेनेच्या प्रवक्ता व उपनेत्या शितल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि उबाठा शिवसेनेच्या प्रवक्ता आणि उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यात एक्सवर जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. शितल म्हात्रे यांनी एक्सवरून सुषमा अंधारे यांना डिवचताना थेट मातोश्रीचा उल्लेख केला आहे. तर सुषमा अंधारे यांनीही जुने व्हिडिओचे प्रकरण सांगितले आहे.
मातोश्रीच्या मॅडमची किती चापलूसी कराल?
ताई, उबाठाच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेली विधान परिषदेची जागा मिळवण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमची किती चापलूसी कराल? प्रियांका चतुर्वेदींची राज्यसभेची जागा घेण्याचा तुमचा डाव फसला…आता थेट उबाठाच्या जागेवरच डोळा आहे की काय तुमचा??? त्यातच आदू बाळाने गेल्या आठवड्यात गांजा राऊतची कॉलर धरली म्हणे…ताई, खासदार-आमदार व्हायची स्वप्नं आता सोडून द्या…मॅडमच्या इशाऱ्यावर तुम्ही कितीही नाचलात तरीही तुमच्या राजकीय जीवनातला अंधार काही दूर होणार नाही…असे पोस्ट शितल म्हात्रे यांनी एक्सवर गेली आहे. खरातला पाण्याची लाईन देण्यासाठी ताजमध्ये कोणी बैठक घेतली होती? त्यासाठी मध्यस्थी करणारा नेता कोण होता? पाईपलाइनचा जी.आर. काढण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमने आदेश दिला होता की नाही ? त्यामागे कुठली न्यूमरॉलॉजी होती? याची चर्चा व्हायला पाहिजे ना, ताई? ताई, त्यावेळी तुम्ही शिवसेनेत नव्हत्या… वंदनीय बाळासाहेबांना शिव्याशाप देण्यात आणि उबाठा व आदूबाळाला दहीहंडीच्या थरावर चढवण्यात मग्न होत्या… त्यामुळे तुम्हाला कदाचित माहिती नसेल.!! त्यामुळे ज्यांच्या आदेशाने तुम्ही ही टीवटीव करत आहात, त्यांना जाऊन विचारा – ताज का राज, असा सवाल शितल म्हात्रे यांनी केलाय.
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विधान परिषदेच्या काही जागा भरायच्या आहेत.
राज्यसभेच्या निमित्ताने एका चौथ्या पाचव्या फळीतल्या महिलेने ज्या पद्धतीने नीलम गोरे किंवा शितल मात्रे या बायकांचा Self Goal केला ते बघता आता आपण गाफील राहून चालणार नाही असे या तथाकथित स्वयंघोषित… pic.twitter.com/IN5oMT2Lpe
— SushmaTai Andhare (@andharesushama) March 26, 2026
त्याला सुषमा अंधारे यांनी एक्सवर प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यसभेच्या निमित्ताने एका चौथ्या पाचव्या फळीतल्या महिलेने ज्या पद्धतीने नीलम गोऱ्हे किंवा शितल मात्रे या बायकांचा सेल्फ गेला केला तो. बघता आता आपण गाफील राहून चालणार नाही असे या तथाकथित स्वयंघोषित शिंदेंच्या निकटवर्तीयांना वाटते. विधान परिषदेची जागा मिळवायची असेल तर मग आता शिंदेंची भाटगिरी आपल्यालाही करावीच लागेल आणि ती अधिक तीव्रतेने करावी लागेल यासाठी दोघीही जोमाने कामाला लागल्या मग सभागृहामध्ये नीलम गोऱ्हे अकलेचे तारे तोडायला लागल्या तर सभागृहाच्या बाहेर शितल म्हात्रे. म्हात्रे काय गोरे काय… यांचे कवित्व करायला पाने पुरणार नाहीत…दोघींनाही प्रेमळ सल्ला.. आवरा स्वतःला मला संशोधन करण्याची वेळ आणू नका… अशा इशाराही अंधारे यांनी दिलाय. तसेच पत्रकार परिषद घेत अंधारे यांनी शितल म्हात्रे आणि माजी उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यावर टीका केलीय. दोघींच्या ही हे लक्षात यावे चौथ्या पाचव्या फेरीतल्या महिलांनी तुम्हाला बघता बघता टेकओव्हर करून किल्लासर केला आहे. तुम्ही आता काय करता आता सध्या, असं म्हणत अंधारे यांनी निलम गोऱ्हे आणि शितल म्हात्रे यांना डिवचले आहे. नीलम गोऱ्हेंनी पुण्यातली शिवसेना संपून टाकली की विकली आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत अक्षरश: शिवसैनिक निलम गोऱ्हेंची घरात घुसायला लागले आहे. त्यांनी पक्ष बांधणी आणि संघटना बांधणीवर बोलावं. तुम्ही काय म्हणालात मला तीन दिवस ट्रोल केला जाईल तुमच्या लक्षात आलं का लोकांनी तुम्हाला ट्रोल करण सोडा तुम्हाला गिनतीत धरलं नाही, तुम्हाला ट्रोल करावं इतकं ही तुमचं चर्चा मूल्य शिल्लक राहील नाही तुमचं उपद्रव मूल्य शून्य ठरलं आहे, असे अंधारे म्हणाले.
हिम्मत असेल तर शस्त्र परवान्यावर बोला-अंधारे
म्हात्रेबाई बोलायला भाग पाडू नका ? 2012 ला शस्त्र परवाना कोणी दिला ? तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते. त्या शस्त्र परवान्याचे 2024 ला नूतनीकरण झालंय, हे पोलिस तपासात निष्पण झालाय. 2024 ला मुख्यमंत्री सो कॉल्ड चाणक्य देवेंद्र फडणवीस आहेत. म्हात्रेबाई तोंडात दात असतील, हिम्मत असेल, छाती असेल. फार ताकद असेल तर धैर्याने विचारा 2024 ला शस्त्र परवाना कसा दिला ? मी सांगू शकते. ग्रामसभेची पाण्याची मागणी केली आहे. चाकणकर यांच्या शिफारशीनंतर तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पाणीपुरवठ्याची योजनेला मान्यता दिली आहे. शस्त्रपरवान्याची मानवतेची गरज नाही. 2024 ला शस्त्रपरवानाचे नूतनीकरण गृहखात्याने का केले ? याच्यावर बोलण्याची हिम्मत ठेवा, असे अंधारे म्हणाल्या. ताज का राज काय आहे यावर मी बोलत नाही. पण गाडीतील, ताजचे राजकारण त्यांना जास्त माहिती आहे. ताज, ट्रायडेंट कंस असतं त्यांना माहिती आहे. अँटी चेम्बर कसं असतं ? आम्हाला माहिती नाही. उगाच इकडे तिकडे उडा मारू नका. ताजचा विषय असेल गाडीवरील रॅलीतील विषय असेल किंवा अँटी चेंबरचा विषय असेल कशाला बोलायला लावता. तो जुना व्हिडिओ मॉर्फ होता तर मी ऑरेजनल व्हिडिओ कुठे आहे, असा सवाल अंधारे यांनी केलाय.
