Sheetal Mhatre Video : मुख्य आरोपी म्हणून पोलीस राज प्रकाश सुर्वे यांनाच अटक करतील, वरुण सरदेसाई यांचा टोला

  • Written By: Published:
Sheetal Mhatre Video : मुख्य आरोपी म्हणून पोलीस राज प्रकाश सुर्वे यांनाच अटक करतील, वरुण सरदेसाई यांचा टोला

“शीतल म्हात्रे यांचा जो खरा व्हिडीओ आहे, तो प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांनी आपल्या फेसबुक पेजवर लाइव्ह केला आहे. त्यामुळे जर या प्रकरणात कुणाला अटक करायची असेल तर मुंबई पोलीस प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला अटक करू शकतील.” असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी लगावला आहे. मुंबई येथे ते आज पत्रकारांशी बोलत होते.

आतापर्यंत या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्या सर्वांना 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या पाच आरोपींपैकी चार जण ठाकरे गटाचे तर एक जण काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. त्यावरून सरदेसाई यांनी प्रतिक्रीया दिली.

Uddhav Thackeray : बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी दिलासा पण गौरी भिडे सुप्रीम कोर्टात जाणार

यावेळी बोलताना वरून सरदेसाई म्हणाले की, ” माझ्या माहितीनुसार, हा जो खरा व्हिडीओ आहे, तो प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांनी आपल्या फेसबुक पेजवर लाइव्ह केला आहे. त्यामुळे जर या प्रकरणात कुणाला अटक करायची असेल तर मुंबई पोलीस प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला अटक करू शकतील.

ते पुढे म्हणाले की,”मुंबई पोलीस दल हे अतिशय सक्षम पोलीस दल आहे. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे, ते बरोबर जो मुख्य आरोपी आहे, ज्याने हा व्हिडीओ बनवला म्हणजेच प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे याला अटक करू शकतात.”

जितेंद्र आव्हाडही विधानसभेत आक्रमक

या प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडही आक्रमक झाले. ते म्हणाले की सदर व्हिडिओ मोर्फ आहे की नाही,याची सत्यता SIT पडताळून पाहिलच.पण SIT ने कोणताही निष्कर्ष काढण्याच्या आधीच हे सरकार पोलिस यंत्रणेला हाताशी धरत या प्रकरणातील मुलांना रात्री अपरात्री घरी जाऊन अटक करत आहे हे चुकीचे आहे.हा व्हिडिओ जो प्रसारमाध्यमात व्हायरल झाला तो सर्वप्रथम प्रकाश सुर्वे यांच्या मुलाच्या पेजवरून व्हायरल झाला.

कारण त्यांच्या मुलाने सदर कार्यक्रमाचे फेसबुक लाइव्ह केले होते.आणि त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला.मात्र त्यानंतर हा व्हिडिओ सुर्वे यांच्या मुलाने पेजवरून डिलीट केला.माझा प्रश्न असा आहे की, सदर व्हिडिओ मध्ये काहीही आक्षेपार्ह नसताना सुर्वे यांच्या मुलाने तो व्हिडिओ डिलीट का केला..? सरकारी यंत्रणेला हाताशी धरून,त्याचा गैरवापर करून तुम्ही खऱ्याच खोटं किंवा खोट्याच खर करू शकत नाही.

हे जे अटक सत्र तुम्ही सुरू केलं आहे त्याच एकच कारण आहे,हे सरकार त्यांच्याविरोधात बोलणाऱ्या प्रत्येक आवाजाला प्रचंड घाबरत. विरोधाचा आवाज त्यांना सहन होत नाही. आणि म्हणूनच सोशल मीडियावर प्रभाव असणाऱ्या या विरोधी पक्षातील मुलांना अटक करून समाज माध्यमांत दहशत पसरविण्याच काम “म्हात्रे सुर्वे प्रकरणाचा” वापर करत हे सरकार करत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube