Raju Shetty : स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी बुलढाण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करताच आता स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी त्यांच्या मनातलं बोलून दाखवलं आहे. राज्यात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय नेते आपापला मतदारसंघात चाचपणी करीत आहेत. अशातच आता रविकांत तुपकरांच्या घोषणनेंतर तुपकर स्वतंत्र निवडणूक लढवत असतील तर चांगलंच पण त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडूनच निवडणूक लढवावी, असं मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.
राजू शेट्टी म्हणाले, मागील दोन वर्षांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महाविकास आघाडीशी युती होती. आता आमची युती नसून आगामी लोकसभा निवडणूकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनाही मैदानात उतरणार आहे. त्यासाठी स्वाभिामानीकडून राज्यातील 6 लोकसभा मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, परभणी आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. राज्यातील या सहा लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी संघटनेकडून कामाला सुरुवात करण्यात आल्याचं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं होतं.
Goldy Brar : गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेणारा गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित
राजू शेट्टी यांनी लोकसभा स्वाभिमानी पक्ष लढवणार असल्याची घोषणा केल्यानंतरच रविकांत तुपकर यांनी बुलढाणा मतदारसंघावर दावा ठोकल्याचं पाहायला मिळालं होतं. आमचा मूळ प्रश्न सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हा असून शेतकऱ्यांच्या या प्रश्नांचं मूळ दिल्लीत आहे. सोयाबीन आणि कापसाचा भाव आणि त्याची धोरणं दिल्लीच्या दराबाबत आखली जातात. त्यामुळेच जनतेकडून मला लोकसभा निवडणुकीसाठी दबाव टाकला जात आहे. मी शेतकऱ्यांच्या आशिर्वादाने लोकवर्गणीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केलं होतं.
New Year : इतिहासातील सर्वात मोठी आतषबाजी ते युद्ध; पाहा जगभरात 2024 चं कसं स्वागत झालं?
बुलढाणा मतदारसंघ रविकांत तुपकर यांच्यासाठी सोडणार आहोत. तुपकर स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा विचार करत असतील, तर चांगलंच आहे. याचं आम्ही स्वागत करतो. पण, तुपकरांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवावी,” अशी अपेक्षा राजू शेट्टींनी व्यक्त केली आहे.