New Year : इतिहासातील सर्वात मोठी आतषबाजी ते युद्ध; पाहा जगभरात 2024 चं कसं स्वागत झालं?

2023 चा निरोप घेत 2024 या नव्या वर्षाचं जगभरात उत्साहात स्वागत करण्यात आलं. यामध्ये अनेक ठिकाणी आकर्षक आतषबाजी तर अनेक ठिकाणी परंपरेनुसार नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.

न्युझीलँडमध्ये सर्वात आधी 2024 चं स्वागत करण्यात आलं भारतीय वेळेनुसार 31 डिसेंबरच्या संध्याकाळी 4.30 वाजता 10 सेकंदच्या काउंटडाऊननंतर ऑकलॅंडच्या स्काय टॉवरवर आतशबाजी करण्यात आली.

हॉंगकॉंगमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी इतिहासातील सर्वात मोठी आतषबाजी करण्यात आली. बारा मिनिटं ही आतषबाजी चालली.

ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये देखील हार्बर ब्रिज आणि ऑपेरा हाऊसजवळ बारा मिनिटांची आतषबाजी करण्यात आली. त्यासाठी 15 महिन्यांपासून तयारी करण्यात येत होती.

दुसरीकडे हमास-इस्त्रायलच्या युद्धामुळे गाजातील लोकांसाठी 2024 काही प्रमाणात आशा घेऊन आलं आहे. जगात एकीकडे लोक नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करत असताना गाजामध्ये मात्र लोक अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासाठी संघर्ष करत आहेत.

जपानमध्ये पारंपारिक रित्या बुद्ध मंदिरांमध्ये 108 वेळा घंटा वाजवत 2024 स्वागत करण्यात आलं. त्यासाठी त्सुकिजी मंदिराबाहेर हजारो लोक एकत्र आले होते. त्यांना गरम दूध आणि सूप देण्यात आलं.

चीनमध्ये देखील परंपरेनुसार राजधानी बीजिंगमध्ये शोउगेंग पार्कमध्ये व्हायोलिन वाजवत नवीन वर्षाचे स्वागत केले.
