Ajay Maharaj Baraskar : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे लेट्सअप मराठीशी (Letsupp Marathi) बोलताना मराठा आंदोलक अजय महाराज बारस्कर यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
लेट्सअपशी संवाद साधताना अजय महाराज बारस्कर म्हणाले की, आज संविधान दिवस आहे आणि मनोज जरांगे पाटील किती संविधान फॉलो करतात. या संविधानाने माझी अभिव्यक्ती व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे आणि तुम्ही सांगतात तुमच्या तोंडाला काळं फासू पण तुम्ही कोण सांगणारे तुम्ही हुकूमशाह आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी जरांगे पाटील यांना विचारला.
पुढे बोलताना अजय महाराज बारस्कर म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने महायुतीला मत देऊन जरांगे पाटील यांना चपराक दिली आहे. मराठा समाजाने महायुतीच्या बाजूने निकाल दिला आहे आणि ही एक प्रकारे जरांगे पाटील यांना चपराक आहे. असं देखील ते म्हणाले. तसेच सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात आहे. त्यामुळे उपोषणाने आरक्षणाचा मुद्दा सुटणार नाही. असं देखील बारस्कर म्हणाले.
जरांगे पाटील यांच्याशी माझे भांडण नाही. आपला प्रश्न कायदेशीर आहे. संविधानिक आहे. तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही मराठा समाजातील इतर व्यक्तींशी चर्चा करा आणि आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवता येईल ते पहा. असा सल्ला देखील अजय बारस्कर यांनी जरांगे पाटील यांना दिला. तसेच जरांगे पाटील यांनी सोंग घेतला आहे. फक्त उठलं की यांच्या तोंडाला काळं फसणार, जरांगे तुम्ही काळं नका. फासू तुम्ही बंदूक घेऊन या आणि माझ्या छातीमध्ये गोळ्या घाला. मात्र त्यापूर्वी तुम्ही माझ्या काही प्रश्नाचे उत्तर द्या. असं देखील बारस्कर म्हणाले.
‘दाल में कुछ काला है’, भाजपाकडे मोठी शक्ती तरीही…, अंबादास दानवेंची सडकून टीका
निवडणुकीत मराठा संपला नाही तर जरांगे फॅक्टर संपला असा टोला देखील बारस्कर यांनी लेट्सअपशी संवाद साधताना मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांना लावला.