Jitendra Awhad on Sunil Tatkare मुंबईः राष्ट्रवादी पक्ष (NCP) व चिन्ह कुणाचे यावर भारत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. त्यावर अजित पवार गट व शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये जोरदार जुंपली आहे. शरद पवार हे आमचे दैवत आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात कोणत्याही कारवाईची मागणी करणार नाही, असे विधान अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केले आहे. त्याला आज जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad on Sunil Tatkare) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. हे बेगडी प्रेम दाखवून नका, वैर घ्यायचे तर समोरासमोर घ्यायचे असे चँलेजच आव्हाड यांनी तटकरे यांना दिले.
बुलढाणा : रविकांत तुपकर यांना अटक; सोयाबिन, कापसाचे आंदोलन चिघळण्याची शक्यता
जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवार यांना तुम्ही दैवत म्हणत आहात. पण त्या पवारसाहेबांना तुम्ही त्यांचाच घरातून हुसकावण्याचे काम करतायत आणि त्यांना कशाला दैवत म्हणता. त्यांना दैवत म्हणून त्यांचा अपमान करत आहात. मुँह में राम, पेट में नथुराम अशी तुमची परिस्थिती आहे. त्यांचा पक्ष, निशाणी ताब्यात घ्यायची आहे. दैवत म्हणण्याचे हे बेगडी प्रेम दाखवून नका, वैर घ्यायचे तर समोरासमोर घ्यायचे आहे.
आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा; नाशिक अन् बीडचे शिलेदार करणार देशाचे प्रतिनिधित्व
तुम्ही पहिल्यांदा राष्ट्रवादीत आले नाहीत. खूप विचार करून आलात. राष्ट्रवादीशिवाय पर्याय नव्हता. तेव्हा तुम्ही राष्ट्रवादीत आलात. मी याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. अब्दुल रहमान अंतुले यांनी तुम्हाला राजकीय जन्म दिला. त्यांनी तुम्हाला जिल्हा परिषद सदस्यत्त्व दिले. त्यांना झोपवायला तुम्ही कमी नाही केले, अशी टीकाही आव्हाड यांनी केली आहे.
शरद पवारांना संपविण्याची सुपारी मिळालीय, ती वाजवत बसा !
राजकारणात वयाचा आणि नात्या-गोत्यांचा काहीच संबंध नसते. राजकारणात माणुसकी नसते हे तुम्ही सिद्ध करून दाखविले आहे. ज्या पवार साहेबांनी राज्यमंत्री केले. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष बनविले आहे. त्यांना घराच्या बाहेर काढला तुम्ही निघाला आहात. त्यांनी जन्माला घातलेला पक्ष हिसकावून घेताना मागे-पुढे पाहत नाहीत.
कृपया विनंती आहे की पवार साहेबांना दैवत म्हणू नका. साहेब देव नाहीत. माणूस आहेत. त्यांनाही वेदताना, यातना होतात. तुमच्या डोळ्यात अश्रू येत नाही.
त्यासाठी ह्दय लागते. ते तुमच्याकडे नाहीत. कृपया दैवत, विठ्ठल पांडुंरग अशी भाषा त्यांच्यासाठी वापरू नका. तुम्हाला शरद पवारांना संपविण्याचा सुपारी मिळाली आहे. ती सुपारी वाजवत बसा, असे टोलाही आव्हाडांनी लगावला आहे.