मुंबई : दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या बाबतीत शिवराळ भाषेचा वापर केला होता. त्याविरूद्ध ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. तसेच सुषमा अंधारे आक्रमक झाल्या आहेत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशी भूमिका अंधारे यांनी घेतली आहे.
महिला आयोगाकडून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या पत्राची दखल घेण्यात आली आहे. महिला आयोगाने संजय शिरसाटांचे सगळे व्हिडीओ पोलिसांकडून मागवून घेतले आहे. हे सर्व व्हिडीओ तपासून महिला आयोग निर्णय घेणार आहे. लवकरत हे व्हिडीओ तपासून महिला आयोग कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.
शिरसांटांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि ठाकरे गटाकडून अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण पोलिसांनी याची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे आता सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोागाता दरवाजा ठोठावला आहे. संजय शिरसाट यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारं पत्र त्यांनी महिला आयोगाला पाठवलं आहे.
Sanjay Shirsat : तर मी एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंकडे भेटायला घेऊन जाईन, पण…
त्यामुळे आता महिला आयोगाने संजय शिरसाटांचे सगळे व्हिडीओ पोलिसांकडून मागवून घेतले आहे. हे सर्व व्हिडीओ तपासून महिला आयोग निर्णय घेणार आहे. लवकरत हे व्हिडीओ तपासून महिला आयोग कारवाई करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता संजय शिरसाट यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.