Sanjay Raut on Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय राज्यभरात चर्चेत आहे. या रुग्णालयात वेळेवर उपचार मिळाले नाहीत म्हणून तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या प्रकारावरून रुग्णालय प्रशासन आणि थेट राज्य सरकारवर टीका केली जात आहे. आता तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यात भाजपलाही ओढलं आहे. जिथे जिथे भाजपच्या विचारांचे लोक आहेत ते सर्वच राहू केतू आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. हे जे म्हणत आहेत राहू केतू वगैरे हे सगळे मोदी, शहा भाजपचे अंधभक्त आहेत. हे काही आम्हाला सांगायची गरज नाही. अंधभक्त हा धर्मांध असतो त्यांच्या डोक्याला एक बधिरता आणली राजकारणामुळे आणि त्यातून त्यांना राहू केतू दिसतात अशी टीका संजय राऊत यांनी केली.
आम्ही एअर इंडियाच्या चेअरमनला मारले वॉचमनला नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला
पन्नास रुपयांनी गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत, तो टॅरिफचा परिणाम आहे की नाही हे मला माहीत नाही. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. तर भारतामध्ये पेट्रोल डिझेल गॅसच्या किंमती का वाढाव्यात ही कसली वसुली चालू आहे? भारतासारख्या देशांमध्ये निर्मला सीतारमण या महागाईमध्ये आणखी तेल ओतण्याचे काम करत आहेत. माझे आवाहन आहे स्मृती इराणी आणि कंगना राणावत यांना स्मृती इराणी यांना आमंत्रित करतो आमच्या आंदोलनाचं त्यांनी नेतृत्व करावं. हा राजकीय प्रश्न नसून गृहिणींच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. सिलिंडर आम्ही पुरवू तुम्ही फक्त आता रस्त्यावर बसायला या अशा प्रकारचे आंदोलने शिवसेना करत आली आहे असे राऊत म्हणाले.
संपूर्ण देश विकून झाल्यावर.. वक्फची संपत्ती दिसली, संजय राऊतांनी साधला PM मोदींवर निशाणा
भारतासारख्या देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेल हे पन्नास रुपयांवर स्थिर असायला पाहिजे आणि सिलेंडरच्या किमती सुद्धा किमान चारशे रुपयांनी खाली आणायला पाहिजेत. आम्हाला अर्थशास्त्र शिकवू नका अर्थशास्त्र आम्हालाही कळतंय. या देशांमध्ये प्रत्येक बाबतीत सामान्य माणसांची लूट सुरू आहे. निवडणुका आल्या की एखादी लाडक्या बहिणींसारखी योजना आणायची चार महिने राबवायची आणि नंतर वाऱ्यावर सोडून द्यायची असे प्रकार सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांची कोंडी वगैरे हा काही विषय नाही त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचं अस्तित्व नाही. ठाण्यामधल्या विधानसभेतल्या जिंकलेल्या या जागा फक्त भारतीय जनता पक्षाच्या मदतीने आणि पैशाची ताकद आणि ईव्हीएमचे घोटाळे यांमुळे जिंकल्या आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली.