Sanjay Raut On Kirit Somayya : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बंगळुरु येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीवर व एनडीएच्या बैठकीवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी एनडीएच्या बैठकीवर टीका केली आहे. गेल्या 9 वर्षात तुम्हाला एनडीए आठवली नाही, असे म्हणत त्यांनी भाजपला सुनावले.
राऊत म्हणाले, 9 वर्षांमध्ये मोदी-शहा यांना एनडीए आठवली नव्हती. आम्ही जमतोय म्हटल्यावर मोदींना एनडीएची आठवण झाली. आपले मित्र पक्ष आठवले नव्हते, आमचे सहकारी पक्ष आठवले नव्हते. मोदी शहांच्या गटाला आता एनडीए आठवलं. वारंवार मोदींनी आपल्या भाषणात आम्ही म्हणजे इंडिया असं म्हटलं आहे. मोदी म्हणजे इंडिया नाही. बीजेपी म्हणजे इंडिया नाही. हर व्यक्ती इंडिया आहे.
ढालीप्रमाणे उभे राहिलात पण…; सोमय्या व्हिडिओ प्रकरणात आव्हाडांच्या मुलीची एन्ट्री
यावेळी त्यांनी अजित पवारांचे नाव न भाजप व अजित पवारांच्या युतीवरुन निशाणा साधला. तुमच्या बाजूला सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा आहे. सगळे भ्रष्टाचारी सोबत घेऊन तुम्ही आमच्याबरोबर भ्रष्टाचाराचा आरोप करत आहात हे जरा बंद करा, अशा शब्दात त्यांनी भाजपला सुनावले. तसेच आम्ही 26 पक्ष एकत्र आल्यानंतर तुमचं कमळाचे फुल फुलायला लागलं, तोपर्यंत आठवण नव्हती. हा इंडिया तुमच्या हुकुमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. इंडिया जिंकणार, भारत जिंकणार, हुकूमशाहीचा पराभव होणार. हा आमचा नारा आहे.
यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित व्हायरल व्हिडीओ क्लिपवर देखील भाष्य केले. ते म्हणाले, “मी एकच सांगतो, में गांधीजी का भक्त हूँ, ना में बुरा देखता हूँ, ना में बुरा बोलता हूँ. जिसने पाप किया होगा उसे भूगतना पडेगा”, असे म्हणत त्यांनी सोमय्यांच्या प्रश्नावर उत्तर दिले.