Sanjay Raut News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि केंद्रीय मंत्री अमित शाह(Amit Shah) यांना पक्ष फोडण्याचा हिशोब द्यावा लागणार असल्याचं खोचक प्रत्युत्तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी अमित शाह यांनी इंडिया आघाडीला मागील 40 वर्षांचा हिशोब मागत सडकून टीका केली आहे. त्यावरुन संजय राऊतांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.
कोल्हापूरमधून शाहू महाराजच! पवार-ठाकरेंनी मिळून रोखला ‘संभाजीराजेंच्या स्वराज्य’चा विस्तार
संजय राऊत म्हणाले, केंद्रीय मंत्री अमित शाह यांना आम्ही मागील संपूर्ण वर्षांचा हिशोब देण्यास तयार आहोत, मात्र, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी सरकार पाडण्यासाठी, शिवसेन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यासाठी, खासदार, आमदार विकत घेण्यासाठी किती काळा पैसा खर्च केलायं, त्याचा हिशोब द्यावा, आम्हीही हिशोब द्यायला तयार असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.
पंकजांच्या नेतृत्त्वाला शाहांचा कौल; वन टू वन चर्चेमुळे बीडमधील समीकरणं बदलणार
तसेच अमित शाह महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्राच्या जनतेचं मनोरंजन करतात. पक्ष फोडण्याचा हिशोब मोदी आणि शाहांना द्यावा लागेल
आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. मोदी आणि अमित शाह तुम्ही किती काळा धन सरकार पाडण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी फोडण्यासाठी, खासदार आमदार, विकत घेण्यासाठी खर्च केले त्याचा पूर्ण हिशोब द्या, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते अमित शाह?
इंडिया आघाडीतील सर्व पक्ष घराणेशाही मानणारे आहेत. घराणेशाही मानणारे पक्ष लोकशाहीला पूरक नाहीत. इंडिया आघाडी फक्त मुलामुलींना सत्तेत बसवण्यासाठीच एकत्र आली असून सोनिया गांधींना राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचं आहे, शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायंच आहे, तर उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं असून ममता बॅनर्जी यांना पुतण्याला तर स्टॅलिन यांना मुलाला मुख्यमंत्री बनवायंच असल्याची सडकून टीका अमित शाह यांनी केली आहे. तसेच इंडिया आघाडी मागील 40 वर्षांपासून सत्तेत होती इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मागील 40 वर्षांत काय केलं याचा हिशोब द्यावा, आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचं अमित शाह म्हणाले होते.