Sushma Andhare News : राज्यात सध्या आगामी निवडणुकांचं वार वाहू लागलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना सत्ताधाऱ्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत सत्ताधाऱ्यांवर गुवाहाटी दौऱ्यावरुन खोचक टोला लगावला आहे.
जर केली नसती सुरत गुवाहाटी
तर कशाला झाली असती दाटीवाटी..!!!!#goodmorning pic.twitter.com/MFkKanbiFm— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) January 17, 2024
सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस गाडीतून प्रवास करतानाच व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एकाच गाडीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीसांसह एक मंत्री गाडीत बसल्याचं दिसून येत आहे. यादरम्यान, गाडीत सर्वजण दाटीवाटीने बसल्याचं पाहायला मिळालं आहे. याच मुद्द्यावरुन सुषमा अंधारेंनी टोलेबाजी केलीयं.
अंधारे शेअर केलेल्या पोस्ट म्हणाल्या, ‘जर नसती केली सुरत-गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी’ असं कॅप्शन देत सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. या व्हिडिओनूसार एकाच गाडीत शिंदे-फडणवीस-पवार दाटीवाटीने बसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी पोस्टमध्ये टोलेबाजी करत हा व्हिडिओ आपल्या एक्सवरुन शेअर केला आहे.
शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार सुरत-गुवाहाटीला रवाना झाले होते. त्याचवेळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांसह भाजपसोबत जात असल्याचा नारा दिला होता. यादरम्यान, ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांकडे बंड न करण्याबाबत विनवणी करण्यात आल्याचंही पाहायला मिळालं होतं. मात्र, उद्धव ठाकरे यांना न जुमानता एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली.
शिवसेनेत घडलेल्या बंडानंतर अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे यांचा हात धरत भाजपसोबत जाण्याचं पसंत केलं. त्यानंतर आता ठाकरे गटातही काही नेत्यांनी प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याचवेळी सुषमा अंधारे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टीका केल्याचं दिसून आलं. आत्ताही त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा हा व्हिडिओ शेअर करीत निशाणा साधला आहे.