Sushma Andhare News : यह रिश्ता क्या कहलाता है… असं म्हणत ठाकरे गटाच्या फायरब्रॅंड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना टार्गेट केलंय. दरम्यान, मालवणमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळा खाली कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना सळो की पळो केलं जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. अशातच सुषमा अंधारे यांनी शिल्पकार जयदीप आपटे आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांचे छायाचित्र दाखवत जोरदार हल्लाबोल चढवलायं. अंधारे पुण्यात बोलत होत्या.
विनोद तावडेंचा पश्चिम महाराष्ट्रात मोठा डाव; शरद पवार गटाच्या नेत्याशी बंद दाराआड खलबत
सुषमा अंधारे म्हणाल्या, ज्याला दीड फुटी पुतळ्याचा बसवण्याचा अनुभव नाही, अशा शिल्पकाराला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम दिलंच कसं? शिल्पकार जयदीप आपटे हा सनातन प्रभातशी संबंधित असून नितेश राणे यांच्यासोबत त्यांचे अनेक फोटो आहेत. हा जयदीप आपटेचा नितेश राणेसोबत काय दोस्ताना आहे, दोघांच्या दोस्तीमुळेच आपटेला पुतळा उभा करण्याचे काम मिळालंय, ये रिश्ता क्या कहलाता है… यावर आता देवेंद्र फडणीस यांनी उत्तर द्यावं, अशा कडक शब्दांत अंधारेंनी सुनावलंय.
…तर राणेंनी थयथयाट केला असता :
खासदार नारायण राणे आणि नितेश राणे यांचा मुजोरपणा देवेंद्र फडणवीस यांच्या वरदहस्त शिवाय नाही. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र शांत राहून द्यायचा नाही. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील लेखीबाळी सुरक्षित ठेवायचा नाहीत. जयदीप आपटे च्या ऐवजी जावेद असता तर नितेश राणेने काहीतरी थयथयाट केला असता. बदलापुर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या ऐवजी अक्रम शेख असता तर नितेश राणेंनी काय थायतायाट केला असता? असा खोचक टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावलायं.
गुजरातमध्ये पावसाचं थैमान! 30 जणांचा मृत्यू, 17 हजार लोकांचे रेस्क्यू; हवामान विभागाचा इशारा
पुतळ्याचं क्रेडिट घेताना ‘हे’ बोलले नाहीत..
पुढील काळात पत्रकार, पोलिसांना काय झालं तर आम्ही राणेंवर नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्षेप घेणार आहोत. पुतळ खाली आल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात की हे नौदलाचं काम होतं, पण ते क्रेडिट घेताना हे बोलले नाहीत. राजनाथ सिंह यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार आहात का? असा थेट सवालही अंधारे यांनी केलायं.
अजितदादांच्या भूमिकेचं स्वागत…
शिवरायांचा पुतळा खाली कोसळल्यानंतर राज्याचे उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी माफी मागितली आहे. आम्ही अजित पवार यांचं स्वागत करतो आहेत, सरकारमध्ये असूनही अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतलीयं. अजितदादांसारखी भूमिका एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का? असा सवाल अंधारे यांनी केलायं.