गुजरातमध्ये पावसाचं थैमान! 30 जणांचा मृत्यू, 17 हजार लोकांचे रेस्क्यू; हवामान विभागाचा इशारा

गुजरातमध्ये पावसाचं थैमान! 30 जणांचा मृत्यू, 17 हजार लोकांचे रेस्क्यू; हवामान विभागाचा इशारा

Gujarat Rains : गुजरात राज्यात मुसळधार पाऊस होऊन पुराचं (Gujarat Rains) संकट निर्माण झालं आहे. या पुरामुळे सगळीकडे हाहाकार उडाला असून 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. पूरग्रस्त भागातील 17 हजार 800 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. काल बुधवारी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. या पावसामुळे सर्वत्र पाणी जमा झाले आहे. यानंतरही पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. पुढील काही दिवस असाच पाऊस होत राहिल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Uttarakhand Rain : उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात 4 मजुरांचा मृत्यू, बचाव कार्य सुरू

स्थानिक प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेना, भारतीय वायू सेना आणि भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने मदतकार्य सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही (PM Narendra Modi) राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. सध्या येथे पाऊस सुरू आहे. अजूनही काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने (IMD Alert) व्यक्त केला आहे. आज राज्यातील 11 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर 22 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या पावसाते ज्यांचा मृत्यू झाला आहे ते नागरिक अहमदाबाद, जामनगर, देवभूमी द्वारका, पंचमहाल, अरवल्ली, डांग, सुरेंद्रनगर, दाहोद, खेडा, भरुच, आणंद, महीसागर, बडोदा, गांधीनगर आणि मोरबी येथील आहेत.

Gujarat Bridge Collapse : मोठी दुर्घटना! गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला; 2 जण ठार

मदतकार्य वेगाने सुरू आहेत. आतापर्यंत 17 हजार 800 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. दोन हजार लोकांना वाचवण्यात यश मिळाले आहे. मागील तीन दिवसांत 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी राज्यात विविध ठीकाणी भिंत पडून आणि पाण्यात बुडून कमीत कमी नऊ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारी विभागांनी दिली.

राज्यातील 140 जलसाठे आणि धरणांसह 24 नद्यांनी धोक्याची पातळी पार केली आहे. पावसामुळे वाहतूक आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रस्ते आणि रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. पश्चिम रेल्वेने सांगितले की जवळपास 48 रेल्वे रद्द करण्यात आले आहे. 14 रेल्वे अंशतः रद्द केल्या आहेत तर सहा रेल्वेंना मध्येच रोखण्यात आले आहेत. तर 23 रेल्वेंच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत होईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube