16 आमदारांच्या प्रकरणावरुन ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवणार?

Thackeray group will send a letter to the Assembly Speaker on the issue of 16 MLAs? : महाराष्ट्र सत्तासंघर्षावर घटनापीठाने गुरुवारी निकाल दिला होता. महाराष्ट्रातील सत्ताबदलाच्या काळात घेतलेल्या विविध निर्णयांवर सुप्रीम न्यायालयाने (Supreme Court) आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. शिंदे गटाला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. त्याचवेळी न्यायालयाने […]

FIR Against Ex MD Of BharatPe, Family For Allegedly Defrauding The Fintech Of ₹81 Crore (26)

FIR Against Ex MD Of BharatPe, Family For Allegedly Defrauding The Fintech Of ₹81 Crore (26)

Thackeray group will send a letter to the Assembly Speaker on the issue of 16 MLAs? : महाराष्ट्र सत्तासंघर्षावर घटनापीठाने गुरुवारी निकाल दिला होता. महाराष्ट्रातील सत्ताबदलाच्या काळात घेतलेल्या विविध निर्णयांवर सुप्रीम न्यायालयाने (Supreme Court) आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. शिंदे गटाला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. त्याचवेळी न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सभापती राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे पाठवले आहे. त्यांनी यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, अद्याप यावर निर्णय झाला नाही. त्यामुळं 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय रिझनेबल वेळेत घेण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट आज विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिणार आहे.

शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील, असं न्यायालयानं निकालात नमूद केलं आहे. न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवले आहे. या रिझनेबल वेळेत निर्णय घ्यावा, असं कोर्टानं सांगितलं. मात्र, याच रिझनेबल वेळेवरून राजकीय नेत्यांमध्ये तणतण सुरू आहे.

कोर्टाची सुनावणी आणि निकाल पाहता कोर्टाने शिंदे गटाची चांगलीच कानउघाडणी केली. त्यामुळं नार्वेकरांना ठाकरेंच्या बाजूने निर्णय द्यावा लागणार आहे. आणि तसं झालं तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळू शकतं. त्यामुळं नार्वेकर हे आपला निर्णय लांबणीवर टाकणार, असे संकेत मिळाल्याने ठाकरे गट चांगलच आक्रमक झाला. नार्वेकरांनी शक्य तितक्या लवकरात लवकर आपला निकाल द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

Santosh Chaudhari : ‘बिग बॉस’फेम दादूसचा हळदीच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार

कोर्टाने आपला निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाने तीन पत्रकार परिषदा घेत आपली बाजू मांडली आणि नार्वेकरांनी लवकरात लवकर आमदारांबाबत आपला निर्णय घ्यावा, अशी भूमिका घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने आखलेल्या चौकटीत राहूनच 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय द्यावा लागेल, नाहीतर पुन्हा सुप्रीम कोर्टात जावं लागणार आहे. असा थेट इशाराच उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना दिला. तीन दिवसांपर्वी ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं होतं की, विधानसभा अध्यक्षांना अपात्र आमदारांच्या निर्णयाबाबत पत्र लिहिणार आहोत, असं स्पष्ट केलं. तर आज 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय रिझनेबल वेळेत घेण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट आज विधानसभा अध्यक्षांना पाठवण्यात येणार आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता याबाबत कधी निर्णय घेतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Exit mobile version