Download App

ठाकरे कुटुंबाकडे विरोधी पक्ष नेते पद नकोच, भास्कर जाधव यांना केले खुश!

Bhaskar Jadhav’s for Leader of Opposition to Assembly Speaker : महाराष्ट्राचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी देखील राज्याला विरोधी पक्ष नेता मिळालेला नाही. विरोधी पक्ष नेत्यासाठी विरोधकांकडे पुरेषे संख्याबळ नसल्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र ठाकरे शिवसेनेने (Thackeray Shiv Sena) विरोधी पक्ष नेता पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. त्यामुळे आता लवकरच विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) विराजमान होणार आहे.

ठाकरे शिवसेनेचे 28 फेब्रुवारी रोजी मातोश्री येथे विधानसभा सदस्यांची बैठक पार पाडली. विरोधी पक्ष नेता ठरवण्याचा पूर्ण अधिकार पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले होते. त्याप्रमाणे आज ठाकरे शिवसेनेतून विधानसभा अध्यक्षांना (Leader of Opposition to Assembly Speaker) भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत ठाकरे शिवसेनेकडे सर्वात जास्त आमदार असल्यामुळे विरोधी पक्षनेते पदावर त्यांनी दावा ठोकला होता, तर विधान परिषद विरोधी पक्षनेता पदावर काँग्रेस दावा ठोकणार आहे.

आमदारांच्या आंदोलनानंतर आझमींचा नरमाईचा सूर; औरंगजेबबद्दलचं वक्तव्य मागे घेत म्हणाले मी, छत्रपती…

कोण आहे भास्कर जाधव?

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव निश्चित झालं आहे. ठाकरे शिवसेनेकडून त्यांची नावाची शिफारस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. राजकीय कारकीर्दीची सुरुवात त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली. डबल सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधिमंडळ कामकाजाचा प्रदिर्घ अनुभव त्याना आहे. 2009 ते 2014 कालावधीत ते राज्यमंत्री पद भूषविले होते. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास म्हणता येईल.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्या आक्रमकतेचा फायदा पक्षाला होऊ शकतो. शिवसेना पक्ष फुटीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे शिवसेनेला कोकणात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. कोकणात सर्व जागा ठाकरे शिवसेनाच्या हातून गेल्यानंतर गुहागरमधील जागा भास्कर जाधव यांच्या माध्यमातून आपल्यकडे राखण्यात ठाकरे शिवसेनेला यश आले आहे.

घोटाळे, महिलांचे आरोप ते संतोष देशमुख हत्याप्रकरण…धनंजय मुंडेंचे वादग्रस्त राजकीय अन् वैयक्तिक आयुष्य

उद्धव ठाकरे यांची खेळी

कोकण विभागातून एकमेव निवडून आलेल्या भास्कर जाधव यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद देऊन ठाकरे शिवसेना नवीन डाव टाकला आहे. कोकणात शिंदे शिवसेनेला शह देणे,आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणत कोकणी मतदार आहे, त्यातल्या त्यात पूर्व मुंबईत कोकणी मतदार आपल्यकडे वाळविण्याच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंनी उचललेले पाऊल बोलले जात आहे. कोकणातून नारायण राणे, रामदास कदम, मनोहर जोशी या नेत्यांनी यापूर्वी विरोधी पक्ष नेते म्हणून काम पाहिले होते.

 

follow us