आमदारांच्या आंदोलनानंतर आझमींचा नरमाईचा सूर; औरंगजेबबद्दलचं वक्तव्य मागे घेत म्हणाले मी, छत्रपती…

आमदारांच्या आंदोलनानंतर आझमींचा नरमाईचा सूर; औरंगजेबबद्दलचं वक्तव्य मागे घेत म्हणाले मी, छत्रपती…

Abu Azmi withdrawing Controversy Statment on Aurangzeb : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी एक धक्कादायक विधान केलं होतं. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, अशी स्तुतीसुमनं आझमींनी उधळली. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात धर्माची लढाई नव्हती, असंही ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. तसेच सत्ताधारी आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.

‘मियाँ’ शब्द चुकीचा… सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हटलं? वाचा सविस्तर…

त्यानंतर आता आझमी यांचा सूर नरमला आहे. त्यांनी त्यांच्या एक्स या सोशलमिडीया साईटवर आपलं वक्तव्य मागे घेतलं असल्याचं सांगितलं. तसेच ते म्हणाले की, माझ्या वक्तवायचा अपभ्रंश करण्यात आला आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की, औरंगजेब रहमतुल्लाह आलेह यांच्याबद्दल मी तेच बोललो. जे इतिहासकार आणि लेखकांनी सांगितलं आहे.

धनंजय मुंडेंनी माझ्यावर आवाज वाढवला होता; ‘त्या’ भेटीचा उल्लेख करत धसांनी काय सांगितलं?

तसेच मी छत्रपती शिवाजी महाराज , संभाजी महाराज किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं नाही. मात्र माझ्या या वक्तव्याचा कुणाला त्रास झाला असेल तर मी माझं वक्तव्य परत घेतो. तसेच माझ्या या वक्तव्याला राजकीय मुद्दा बनवण्यात आला आहे. ज्याचा वापर महाराष्ट्र विधानसभा सभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बंद करण्यासाठी होत आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे नुकसान होत आहे.

काय म्हणाले होते आझमी?

सपा नेते अबू आझमी यांनीही अधिवेशनाला हजेरी लावली. या वेळी सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि ब्रह्मदेशापर्यंत होती. त्या काळात आपला जो जीडीपी होती, तो २४ टक्के होता. भारताला ‘सोने की चिडीया म्हटलं जायचचं. या सगळ्या गोष्टींना मी चुकीचं म्हणू का, असा सवाल आझमींनी केला. अबू आझमी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई ही सत्तेसाठी होती. ही लढाई धर्मासाठी होती.. हे जर कोणी बोलत असेल तर ते मी मानत नाही, असंही आझमी यांनी म्हटलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube