छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे गौरव; अबू आजमी

छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे गौरव; अबू आजमी

Abu Azmi : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांची युनेस्कोमध्ये नोंद झाल्याबाबत, आज समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आसिम आजमी (Abu Azmi) यांनी हजारो शिवप्रेमीसह चेंबूर, मुंबई येथील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मानवंदना देत जल्लोष साजरा केला.

यावेळी अबू आजमी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण भारताचे गौरव आहेत तसेच ते पूर्ण जगासाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत. ते असे राजा होते जे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालत होते. त्यांचे गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास सांगतात अशा गड किल्ल्यांना युनेस्को (UNESCO) मध्ये नोंद झाल्याबद्दल आज आम्ही सर्व शिवप्रेमिंसह छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन जल्लोष साजरा केला आहे.

संधी होती घालवली, एकही देश भारताच्या बाजूने नाही; अरविंद सावंतांचा मोदींवर हल्लाबोल

पुढे बोलताना अबू आजमी म्हणाले कि, युनेस्को (UNESCO) मध्ये महाराजांच्या 12 गड किल्ल्यांची नोंद झाल्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला चालना तर मिळेलच तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्य व पराक्रम हे जगातील प्रत्येक लोकांपर्यंत जाईल. यावेळी अबू आजमी सह हाजारोच्या संख्येने पार्टी चे कार्यकर्ता व शिवप्रेमी उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube