धनंजय मुंडेंनी माझ्यावर आवाज वाढवला होता; ‘त्या’ भेटीचा उल्लेख करत धसांनी काय सांगितलं?

Suresh Dhas on Dhananjay Munde Meet after Resignation : धनंजय मुंडे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा (Dhananjay Munde Resignation) सुपूर्द केला. राजीनामा स्वीकारल्याचे फडणवीसांना जाहीरही केले. यानंतर विरोधकांनी धनंजय मुंडेवर (Dhananjay Munde) टीकेची झोड उठवली आहे. त्यात या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतलेले भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील मुंडेंशी झालेल्या भेटीचा उल्लेख करत धनंजय मुंडेंनी माझ्यावर आवाज वाढवला होता असं सांगितलं आहे.
सोनम ए कपूर आणि आनंद एस अहूजा यांचा भाने ग्रुप भारतात घेऊन आला लक्झरी कार केअर ब्रँड टोपाझ डिटेलिंग
यावेळी बोलताना धस म्हणाले की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला ही आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पहिल्यापासून आमच्या पीडितांच्या बाजूने होते. यावर अजित पवारांनी दोन आठवड्यांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा असं सांगितलं होतं. मात्र मुंडे त्याला जुमानत नव्हते. मात्र काल जेव्हा संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो समोर आले. त्यानंतर अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला.
Photos : पंतप्रधान मोदींचा वनतारामध्ये फेरफटका! बछड्यांना अंगा-खांद्यावर खेळवत दूध ही पाजलं
तसेच संतोष देशमुख यांच्याकडे खंडणीसाठी जे बैठक झाली होती. त्यामध्ये धनंजय मुंडे यांची उपस्थिती जर असेल तर त्यांचा देखील या प्रकरणाशी थेट संबंध येतो. त्यामुळे त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी. तसेच मुंडेंना भेटीचे कारण म्हणजे मी केव्हा माझ्या पक्षाच्या अध्यक्षांकडे जेवायला गेलो होतो. तसेच यावेळी मला आणि धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणी चर्चा करून वाद मिटवायला सांगण्यात आलं. मात्र मी त्याला स्पष्ट नकार दिला.
आरक्षण मागायचे नाही तर देश चालवायचा; मुंडेंचे कान टोचताना भिडेंचा मराठा समाजाला सल्ला
तसेच मी मुंडेंना रुग्णालयात भेटीला गेलो. कारण जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी मी संतोष देशमुख हत्याप्रकरणी काही कागदपत्र सह्याद्रीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे जमा करत होतो. त्यावेळेस मुंडे यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळालं. त्यामुळे मी भेटीला गेलो. तसेच माझी धनंजय मुंडे यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या सोबत भेट झाली.
औरंगजेबाच्या विचाराला थारा नाही…, अबू आझमीच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी संतापली
त्यावेळी आमच्यामध्ये वाद व्हायला सुरुवात झाली. मुंडेंनी माझ्यावर आवाज चढवला. माझा प्रकरणाशी संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र मी त्यांना मोठ्याने न बोलण्याचा सल्ला दिला. तसेच मी त्यांना म्हटलं की, वाल्मीक कराड आणि तुम्ही शोले चित्रपटातील जय वीरू प्रमाणे जोडी आहे. त्यामुळे आमची पुढील कारवाईसाठी ही लढाई अशी सुरू राहणार असल्याचं यावेळी धसांनी सांगितलं.