औरंगजेबाच्या विचाराला थारा नाही…, अबू आझमीच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी संतापली

Abu Azmi : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी एका मुलाखती दरम्यान औरंगजेबाच्या राज्यकारभारावर स्तुतिसुमने उधळली औरंगजेबा उत्तम प्रशासक असून औरंगजेबाच्या काळात भारताला सोने की चिडिया म्हटलं जात होतं असं वक्तव्य त्यांनी केलं या वक्ताव्याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर अबू आजमी यांच्या निषेधार्थ घोषणा बाजी करण्यात आली. तसेच औरंगजेब व अबू आझमी यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आलं. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे… इथे कुठल्याही प्रकारच्या औरंगजेबाच्या विचाराच्या माणसाला थारा दिला जाणार नाही यांना अहिल्यानगर (Ahilyanagar) मध्ये फिरकू देखील देणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी म्हटले आहे.
अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर भाष्य करत अबू आझमींवर गुन्हा दाखल करा असं म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे 40 दिवस हाल करून मारले. त्यांचा अपमान केला, अत्याचार केला. अशा अत्याचार केलेल्या औरंगजेबला चांगलं म्हणणं हे दुर्दैवी आहे. औरंगजेब म्हणजे क्रुरकर्मा होता. त्याने हिंदूंची मंदिरं तोडली. त्याने गरिबांना लुटले. आया-बहिणींवर अत्याचार केले. त्याने अनेकांना धर्मपरिवर्तन करायला लावलं. असा व्यक्ती चांगला प्रशासक कसा होऊ शकतो, असा सवाल शिंदेंनी केला.
संभाजीराजेंनी धर्माभिमान बाळगला, देशासाठी प्राणाचे बलिदान ददिले. त्यांनी धर्म, राष्ट्राभिमान सोडला नाही. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे. जेवढा याचा निषेध करून, तेवढा कमी आहे. अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. अबू आझमींनी केलेले औरंगजेबाचे कौतूक म्हणजे महापाप आहे. अबू आझमी यांनी माफी मागावी, असंही शिंदे म्हणाले.
अर्रर्र… आजही रोहितचं बॅडलक, सलग 11 व्यांदा गमावला टॉस, केली ‘या’ खेळाडूची बरोबरी
नेमकं काय म्हणाले होते अबू आझमी
औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि ब्रह्मदेशापर्यंत होती. त्या काळात आपला जो जीडीपी होती, तो 24 टक्के होता. भारताला ‘सोने की चिडीया म्हटलं जायचचं. या सगळ्या गोष्टींना मी चुकीचं म्हणू का, असा सवाल आझमींनी केला. अबू आझमी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई ही सत्तेसाठी होती. ही लढाई धर्मासाठी होती.. हे जर कोणी बोलत असेल तर ते मी मानत नाही, असंही आझमी यांनी म्हटलं.