अर्रर्र… आजही रोहितचं बॅडलक, सलग 11 व्यांदा गमावला टॉस, केली ‘या’ खेळाडूची बरोबरी
Champions Trophy : दुबईत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी
Champions Trophy : दुबईत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी (IndvsAus) सामना करत आहे. मात्र पुन्हा एकदा भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस गमावला आहे. या सामन्यात स्टीव्ह स्मिथने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सेमीफायनलमध्ये टॉस गमावल्यानंतर रोहित आता एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक टॉस गमावणाऱ्या कर्णधारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. होय, रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात 11 व्यांदा टॉस गमावला आहे.
रोहित शर्माने कर्णधार म्हणून सलग 11 व्यांदा एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावला आहे आणि यानंतर तो एकदिवसीय सामन्यात कर्णधार म्हणून सर्वाधिक नाणेफेक गमावणाऱ्या कर्णधारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. यासह त्याने नेदरलँड्सच्या पीटर बोरेनची बरोबरी केली, ज्याने मार्च 2011 ते 2013 पर्यंत सलग 11 वेळा टॉस गमावले होते. तर रोहित शर्माने नोव्हेंबर 2023 ते मार्च 2025 दरम्यान 11 वेळा टॉस गमावला आहे. या यादीत ब्रायन लारा सर्वात वर आहे, ज्याने ऑक्टोबर 1998 ते मे 1999 दरम्यान सलग 12 वेळा टॉस गमावला.
तर दुसरीकडे बातमी लिहेपर्यंत ऑस्ट्रेलियाने या सामन्यात 10 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 63 धावा केल्या आहे. भारतासाठी मोहम्मद शामीने आणि वरुण चक्रर्वीतीने एक-एक विकेट घेतले आहे.
एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक टॉस गमावणारे कर्णधार
12 – ब्रायन लारा (वेस्ट इंडिज, ऑक्टोबर 1998 ते मे 1999)
12 – पीटर बोरेन (नेदरलँड्स, मार्च 2011 ते ऑगस्ट 2013 )
11* – रोहित शर्मा (भारत, नोव्हेंबर 2023 ते मार्च 2025 )
उपांत्य फेरीसाठी भारताचा प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
उपांत्य फेरीसाठी ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग इलेव्हन
कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, अॅडम झांपा, तन्वीर संघा.
