अहिल्यानगरमध्ये खाकीचा वचक संपला? कोतकर कुटुंबावर जीवघेणा हल्ला, तिघे जखमी

अहिल्यानगरमध्ये खाकीचा वचक संपला? कोतकर कुटुंबावर जीवघेणा हल्ला, तिघे जखमी

Ahilyanagar Crime News Attack on Kotkar family : अहिल्यानगर (Ahilyanagar Crime News) शहरासह जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अक्षरश मोडकळीस आली आहे. दरदिवशी खून, अपहरण, हत्या अशा घटनांमुळे ऐतिहासिक अशा नगर शहराची प्रतिमा मलिन होत आहे. तरुणाच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना शहरातील निंबळक परिसरात कोतकर कुटुंबावर ( Attack on Kotkar family) एका टोळक्याकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात व्यावसायिक राजू कोतकर यांच्यासह तिघे जखमी झाले (Ahilyanagar News) आहेत. त्यांना उपचारासाठी नगर शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निंबळक शिवारात राजू कोतकर यांचे किराणा दुकान आहे. त्या दुकानासमोर वाद झाले. दरम्यान या वादाचे कारण समजू शकले (Ahilyanagar Crime) नाही. याप्रकरणात संतोष धोत्रे आणि त्याच्या साथीदारांनी राजू कोतकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात राजू कोतकर यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत. त्यांना नागरिकांनी तातडीने उपचारासाठी नगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रणवीर अलाहाबादियाला दिलासा! शो सुरू करण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी; मात्र एका अटीवर

दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून हा हल्ला किती जीवघेणी होता, यावरून स्पष्ट होते. दरम्यान, हल्ला करणार्‍या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. इतर संशयित आरोपी पसार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली.

अत्याचाराच्या घटना दुर्दैवी, आरोपींना भरचौकात फाशी द्या; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

नगर शहरात खाकीचा धाक उरलाच नाही…

नगर शहरात अवघ्या एका दिवसांपूर्वी एका तरुणाचं अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण ताजे असताना शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी एका व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. यामुळे नगर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. एकीकडे किरकोळ करावयाचा डंका पिटवणाऱ्या पोलीस प्रशासनाकडून मात्र गुन्हेगारीला आळा बसविण्यात अपयश येत आहे. यामुळे नगर शहरात खाकीचा धाक हा उरलेलाच नाही, असं चित्र वारंवार स्पष्ट होत आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube