अत्याचाराच्या घटना दुर्दैवी, आरोपींना भरचौकात फाशी द्या; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

अत्याचाराच्या घटना दुर्दैवी, आरोपींना भरचौकात फाशी द्या; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

Supriya Sule : स्वारगेट बस डेपोमध्ये (Swargate Bus Depo) मंगळवारी (२५ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणात आरोपी दत्ता गाडेला घटनेच्या ७० तासांनंतर अटक करण्यात आली. त्यानंतर काल केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड करण्यात आल्याची घटना समोर आली. दरम्यान, आता या सर्व घटनांवर खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) भाष्य केलं.

मोठी बातमी! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर 

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढली आहे.
महिलांवरील अत्याचारांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. चाकणमध्ये एका पोलिस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला झाला, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड झाली, त्याआधी स्वारगेट बसस्थानकात एक तरुणीवर अत्याचार झाला. हे सगळी प्रकरणं गंभीर असून मी या सर्व घटनांचा निषेध करते. राज्यात महिलांची सुरक्षितता ही महत्त्वाची आहे, परंतु महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आणि राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे.

स्वारगेटसारख्या अनेक घटना सातत्याने महाराष्ट्रात होत आहेत. या खूप दुर्देवी आहेत
ज्या पद्धतीने ही घटना घडली आहे, त्या घटनेला ज्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते खूप दुर्देवी आहे. ही घटना अंधारात, कोपऱ्यात झाली नाही. त्या मुलीला प्रंचड भीती दाखवली गेली. समाज म्हणून आपण सर्वांनी महिलांवरील कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराचा जाहीर निषेध केला पाहिजे, असं सुळे म्हणाल्या.

स्वारगेट बलात्कार प्रकरण; आरोपी दत्ता गाडेच्या भावाचा खळबळजनक दावा, पाहा VIDEO 

बदलापूरची घटना घडली तेव्हाही मी फडणवीसांना विनंती केली होती की, महाराष्ट्राने देशासमोर एक उदाहरण द्यावं, बलात्कार आणि अत्याचार या सारखी प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या घटनांमधील आरोपींना भर चौकात फाशीची शिक्षा देण्यात यावी. आताही हीच मागणी करतेय, असं सुळे म्हणाल्या.

डीसीपीने सुरुवातीला सांगितले की ती महिला ओरडली नाही. गृहराज्यमंत्री म्हणतात तरुणीने स्ट्रगल केला नाही. त्यावर सुळे म्हणाल्या की, हे धक्कादायक आहे. मी याचा जाहीर निषेध करते. मी महाराष्ट्र सरकारला विचारते, तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींबद्दल एवढं बोलता, इतका कळवला दाखवता. मग स्वारगेट प्रकरणात सरकारकडून जे काही स्टेटमेंट आला ते योग्य आहे का? असा सवाल करत सरकारने संवेदशील राहणे आवश्यक आहे, पदावर असणाऱ्या व्यक्तीने जबाबदारीने बोलणे आवश्यक आहे, अशी टीका सुळेंनी योगेश कदम यांच्यावर केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube