रणवीर अलाहाबादियाला दिलासा! शो सुरू करण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी; मात्र एका अटीवर

रणवीर अलाहाबादियाला दिलासा! शो सुरू करण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी; मात्र एका अटीवर

Supreme Court allows Ranveer Allahabadi to start the show but on one condition : युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला आज सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. रणवीरचा शो त्याला पुन्हा सुरू करता येणार आहे. मात्र यासाठी सुप्रीम कोर्टाने एक अट घातली आहे. त्याचबरोबर कोर्टाने पुढील निर्णय येईपर्यंत त्याला अटकेपासून संरक्षण दिलं आहे. मात्र त्याला गुवाहाटी येथे चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

लाडक्या बहि‍णींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरेंनी तारीखच सांगितली…

दरम्यान सध्या रणवीरला सुप्रीम कोर्टाने एका अटीवर त्याचा शो पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ती अट म्हणजे त्याच्या शोमध्ये त्याला संवेदनशीलता बाळगावी लागणार आहे. कुठलेही अश्लील विधान करण्यास सक्त मनाई आहे.

मोठी बातमी! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर

गेल्यावेळी झालेल्या सुनावणीत रणवीर अलाहाबादियाने केलेल्या टीकेला न्यायालयाने ‘विकृत’ म्हटलं आहे. अलाहाबादियाच्या टीकेला सर्वोच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत फेटाळलं आहे. रणवीर सारखे लोक आई-वडिलांचा अपमान करत आहेत. या लोकांचं डोकं ठिकाणावर आहे का. अशी वक्तव्यं विकृत मानसिकतेचं लक्षण आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या नवीनतम भागात रणवीर अलाबादिया, आशिष चंचलानी आणि अपूर्वा मुखिजा यांनी हजेरी लावली होती. यावेळी रणवीरने एका स्पर्धकाला आई वडिलांच्या प्रायव्हसीबद्दल आक्षेपार्ह प्रश्न विचारला. रणवीरने शोमधील एका स्पर्धकाला तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की, तुला त्यांच्यासोबत सामील होऊन ते कायमचे थांबवायला आवडेल? असा प्रश्न विचारला. यापैकी कोणताही एक पर्याय निवडायला रणवीरनं सांगितलं होतं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube