सोनम ए कपूर आणि आनंद एस अहूजा यांचा भाने ग्रुप भारतात घेऊन आला लक्झरी कार केअर ब्रँड टोपाझ डिटेलिंग

Sonam Kapoor

Sonam Kapoor : भाने ग्रुपने जगातील आघाडीच्या लक्झरी कार डिटेलिंग आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म (PPF) तज्ज्ञ टोपाझ डिटेलिंग बरोबर भागीदारी करून त्याला भारतात आणले आहे. जगभरातील सुपरकार मालकांमध्ये लोकप्रिय, टोपाझ त्याच्या अत्याधुनिक सुविधांमुळे, अनन्य सेवांमुळे आणि सूक्ष्म कारीगरीसाठी ओळखला जातो.

आनंद अहूजा (Anand Ahuja) आणि सोनम कपूर (Sonam Kapoor), हे दोघेही ऑटोमोबाईल क्षेत्राचे निस्सीम चाहते असून, त्यांच्या नेहमीच उत्कृष्ट डिझाइन आणि बारकाईच्या सौंदर्यशास्त्रावर विश्वास आहे. भारतात कार ही केवळ प्रवासाचे साधन नसून, ती महत्वाकांक्षा आणि समृद्ध कलेचे प्रतीक आहे. टोपाझ डिटेलिंगमुळे भारतातील कार केअर सेवांचे नवे मापदंड ठरतील.

सोनम ए कपूर, सह-संस्थापक, भाने ग्रुप (Bhane Group) , म्हणाल्या, “भानेमध्ये, आम्ही उत्कृष्ट डिझाइन आणि सौंदर्यशास्त्र यावर विश्वास ठेवतो. टोपाझ ऑटोमोबाईल क्षेत्रात हाच दृष्टीकोन मांडतो, जिथे केवळ परिशुद्धता नव्हे तर सौंदर्यशास्त्रही महत्त्वाचे आहे. ही भागीदारी भारतीय बाजारात जागतिक दर्जाच्या लक्झरी सेवांना आणण्याच्या आमच्या दृष्टिकोनाशी पूर्णपणे जुळते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by anand s ahuja (@anandahuja)

आनंद एस अहूजा, सह-संस्थापक आणि सीईओ, भाने ग्रुप, म्हणाले, भारतातील लक्झरी कार समुदायाने टोपाझसारख्या जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान आणि गुणवत्तेची वाट पाहिली होती, आणि आता आम्ही ती गरज पूर्ण करत आहोत. टोपाझ उद्योगात नेहमीच उच्च स्थानावर राहिला आहे, आणि त्याचे नाव नाविन्यपूर्णता व उत्कृष्टतेसाठी ओळखले जाते.

औरंगजेबाच्या विचाराला थारा नाही…, अबू आझमीच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी संतापली

नबील नामो, सीईओ, टोपाझ होल्डिंग्स, म्हणाले, आनंद आणि सोनम यांचे या अद्भुत भागीदारीसाठी मनःपूर्वक आभार! भारत हा टोपाझसाठी एक प्रमुख बाजारपेठ आहे आणि आम्ही भारतीय ग्राहकांना टोपाझची उत्कृष्ट सेवा देण्यासाठी उत्सुक आहोत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube