Sanjay Raut On Eknath Shinde : शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group)खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी शिवसेना शिंदे गटावर (Shiv Sena Group group)जोरदार हल्लाबोल केला आहे. जे आता स्वतःला शिवसैनिक समजत आहेत त्या अफजलखानाची औलादी आहेत, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर केला आहे. त्यांनी मुंबईमध्ये (Mumbai)माध्यमांशी संवाद साधला.
PM मोदींनी रचलेल्या गाण्याची सातासमुद्रापार किर्ती; प्रतिष्ठीत ग्रॅमी अवॉर्डसाठी मिळाले नामांकन
खासदार संजय राऊत म्हणाले की, आज सायंकाळी 4 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाण्यात जाणार आहेत. मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा बुलडोझर लावून तोडण्यात आली होती. त्यामुळे या शाखेची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे जाणार आहेत. त्यांच्याबरोबर असंख्य शिवसैनिक असणार आहेत.
John Bailey Passes Away : फिल्म अकादमीचे माजी अध्यक्ष जॉन बेली यांचे निधन
खासदार राऊत म्हणाले की, मुंब्रा ठाण्याचा आणि महाराष्ट्राचा भाग आहे. शिवसेना शाखेवर बुलडोजर फिरवायला कोणी सांगितले? उद्धव ठाकरे या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि 2024 नंतर ते पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसणार आहेत हे विसरू नका, असेही खासदार संजय राऊतांनी ठणकावले.
उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात येण्यापासून रोखण्याचं कारस्थान पोलिसांनी रचलेलं आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला. कालपासून पोलिसांनी मुंब्रा आणि ठाणे ग्रामीण परिसरात दहशत पसरवलीय. उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स पोलिसांसमोर फाडण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या. तटीपार करण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. पोलिसांची भूमिका उद्धव ठाकरे यांना अडवण्याची आहे. तर आम्हाला आडवून दाखवा, असं आव्हान संजय राऊतांनी केलं आहे.
जे पोलीस आज आम्हाला अडवण्यासाठी हजारोंच्या फौजफाट्यानं कामाला लागले. ते शिवसेनेच्या शाखेवर बुलडोझर फिरवला जात असताना कुठे होते? असाही सवाल यावेळी खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. पोलीस कुणाची गुलामगिरी करत आहेत? असा संतप्त सवाल देखील खासदार संजय राऊतांनी विचारला आहे.