छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं झाल्यानंतर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यावर टीका करायला सुरूवात केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यावरून राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. मात्र यावर ठाकरे गटाकडून त्यांना उत्तर देण्यात आलं नसल्याच्या देखील चर्चा झाल्या त्यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनीदेखील ठाकरे गटाला सुनावले आहे.
मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन म्हणाले की, ‘जलील यांचं बाळासाहेबांबाबतच वक्तव्य अत्यंत निषेधार्य आहे. इम्तियाज जलील सारखे सुशिक्षित खासदार, जे एकेकाळी न्यूज चॅनेलचा अॅंकर राहिल्याल्या व्यक्तिकडून ही आपेक्षा नाही. त्यांनी केलेलं बाळासाहेबांबाबतच वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे. पण यापेक्षाही जास्त वाईट हे आहे की, ठाकरे गटातील विरोधी पक्ष नेते, ठाकरे गटाचे नेते हे यावर का गप्प आहेत ?’
‘त्यांनी जलीलच्या घरावर चालून जायला हवे. ते गप्प आहेत कारण त्यांनी विधान परिषदेवर जाण्यासाठी एमआयएमचे मत घेतले आहेत. ते आता कोणत्या तोंडाने त्यांना विरोध करतील. बाळासाहेबांना ते काहीही म्हटले तरी ते सहन करतील. ठाकरे गटातील ती तेव्हाची आग विझली आहे. ती आग आता ठाकरे गटामध्ये राहिलेली नाही.’ अशा शब्दांमध्ये मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटातील नेत्यांना सुनावले आहे.
Chhatrapati Sambhajinagar नामांतराच्या विरोधातील आंदोलनात झळकले ‘औरंगजेबा’चे होर्डिंग्ज
त्याचबरोबर त्यांनी यावेळी औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं झाल्यानंतर आता शिंदे गटाचे आमदारांनी आता औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर देखील हलवण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. त्यावर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यावर टीका करायला सुरूवात केली आहे. अशा प्रकारे कबरी हलवता येतात का ? असा सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी जलील यांना एक सल्ला दिला आहे.
मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन म्हणाले की, ‘एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, ‘अशा प्रकारे कबरी हलवता येतात का ?’ असा सवाल केला. पण मी जलील यांना सांगू इच्छितो की, 1707 मध्ये अहमदनगर जवळील भिंगार या गावामध्ये औरंगजेबाचं निधन झाले होते. त्यानंतर त्याच पार्थिव औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथे आणण्यात आले. पण त्याकाळी ही काही तंत्रज्ञान नसताना मुघलांनी 7 ते 8 दिवस लागूनही ते पार्थिव हलवले. त्यामुळे असे पार्थिव हलवण्याचे तंत्रज्ञान मुघलांना होते. औरंगजेबाच्या आईचं पार्थिव देखील असा प्रकारे हलवण्यात आलं होतं. त्यामुळे आता देखील औरंगजेवाचं पार्थिव हलवणे कठीण नाही असा सल्ला प्रकाश महाजन यांनी जलील यांना दिला आहे.’