Chhatrapati Sambhajinagar नामांतराच्या विरोधातील आंदोलनात झळकले ‘औरंगजेबा’चे होर्डिंग्ज

Chhatrapati Sambhajinagar नामांतराच्या विरोधातील आंदोलनात झळकले ‘औरंगजेबा’चे होर्डिंग्ज

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या नामांतराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली. मात्र यावेळी या उपोषणास्थळी चक्क औरंगजेबाचे होर्डिंग (Aurangzeb Hoarding) झळकवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. उपोषण सुरू असतानाच काही तरुण हातात औरंगजेबाचे होर्डिंग घेऊन उपोषणास्थळी दाखल झाले होते.

‘जिंदाबाद जिंदाबाद, औरंगाबाद जिंदाबाद’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत. दरम्यान या सर्व घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल होत आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घेतला. तर या निर्णयाच्या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांच्याकडून आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

घराला मोजपट्टी पाहताच आमदारही रडला, कंठ आला दाटून.. हुंदका आवरत सांगितला घटनाक्रम

मात्र या साखळी उपोषणात काही तरुणांनी चक्क औरंगजेबाचे फोटो घेऊन जल्लोष साजरा केला. या सर्व घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील होत आहे. तर यावर प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले की, कोणीतरी आंदोलन खराब करण्यासाठी काही लोकांना फोटो घेऊन पाठवलं, पण आम्ही त्यांना बाहेर काढलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube