Eknath Shine On Aurangabad Rename : आज मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) मोठा निर्णय घेत उस्मानाबाद (Osmanabad) आणि औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतरांवर शिक्कामोर्तब केली आहे. राज्य सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये उस्मानाबाद आणि औरंगाबादचे नाव बदलून धाराशिव (Dharashiv) आणि छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) अशी केली होती. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने निणर्य देत राज्य सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shine) यांनी या निर्णयाचा स्वागत केला आहे.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आज खऱ्या अर्थाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. छत्रपती संभाजीनगर नाव व्हावं हे बाळासाहेबांची इच्छा होती मात्र अडीच वर्ष ज्यांची सरकार चालवली त्यांनी यासाठी काहीच केला नव्हता. जेव्हा आम्ही सरकारमधून बाहेर पडलो तेव्हा त्यांनी घाईघाईत छत्रपती संभाजीनगरचा निर्णय घेतला मात्र तो निर्णय बेकायदशीर होता असं म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला.
आम्ही जेव्हा सत्तेत आलो तेव्हा आम्ही हा निर्णय घेतला आणि आज मुंबई उच्च न्यायालयाने यावर शिक्कामोर्तब केली असं एकनाथ शिंदे म्हणाले. मी जिथे जातो तिथे यश मिळतो, मी या मतदारसंघात 4-5 सभा घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मी या मतदासंघात आहे.
मोठी बातमी! पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान
यामुळे विरोध माझ्यावर टीका करणार मात्र या मतदारसंघातून ज्याचा कार्यक्रम व्हायचा आहे त्याचा कार्यक्रम होणार आणि या लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे विजयी होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त करत.