Mla Disqualification : आमदार अपात्र प्रकरणी विधी मंडळात सुरु असलेली सुनावणी अखेर संपली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या देखरेखीखाली ही सुनावणी सुरु होती. अखेर ही सुनावणी आता संपली असून सुनावणीमध्ये शिंदे (Shinde Group) आणि ठाकरे (Thackeray Group) या दोन्ही गटाकडून अंतिम युक्तिवाद पूर्ण करण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यासह देशाचं लक्ष या ऐतिहासिक निर्णयाकडे लागलं आहे. सर्व पुरावे, युक्तिवाद, कागदोपत्रे, आणि संविधानाच्या तरतूदींचं पालन करुन आमदार अपात्र प्रकरणी लवकरच निर्णय देणार असल्याचं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे.
दूध उत्पादकांना दिलासा! सरकारकडून मिळणार प्रति लिटर 5 रुपये अनुदान, मंत्री विखेंची घोषणा
राहुल नार्वेकर म्हणाले, अपात्र आमदार प्रकरणी दाखल याचिकांवर सुनावणी आज संपली आहे. या सुनावणीदरम्यान सादर केलेल पुरावे, युक्तिवादाच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या कालावधीत निर्णय देणार आहे. मागील दीड महिन्यांपासून सुनावणीचं काम सुरु होतं. सकाळ आणि दुपार असं दोन सत्रात सुनावणी सुरु होती. अधिवेशनातही सभागृहाचं काम उरकून सुनावणी घेण्याचं काम उशिरापर्यंत सुरुच ठेवलं होत, त्यामुळे आता सुनावणी संपली असल्याचं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आहे.
फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा डाव; भर सभागृहात अजितदादांनी जयंत पाटलांना झापलं
तसेच पुढील काही दिवसांत कागदपत्रे पडताळून, वाचून कायदेशीर बाबींचा योग्य वापर करुन निर्णय देणार असून 10 जानेवारीच्या आधी निर्णय देण्यास काही अडचण नाही. या निर्णय प्रक्रियेवरुन माझ्यावर विरोधकांकडून टीका केली जातेयं पण त्या टीकांचा माझ्यावर दबाव पडणार नाही. माझ्यावर दबाव पडावा त्यासाठीच टीका होत असल्याचं नार्वेकर म्हणाले आहेत.
भाजप आमदाराची मागणी, जयंत पाटलांचे आव्हान अन् फडणवीसांनी केली मोठी घोषणा
या प्रकरणी कायदेशीर तरतूदींचा विचार करुनच निर्णय दिला जाणार असून निर्णयात कोणताही पक्षपात केला जाणार नाही. ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय घेतला तर शिंदे गट त्यांची बाजू घेतल्याचं म्हणेल. शिंदे गटाच्या बाजून निर्णय दिला तर शिंदे गटाची बाजू घेतल्याचं ठाकरे गट म्हणेल, पण न्याय द्यायच्या वेळी अशा परिस्थितीला सामोरं जावचं लागतं, असल्याचं नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे.
मला निर्णय द्यायचायं परिणामांचं…
मला फक्त निर्णय द्यायचा आहे. त्याचे काय परिणाम होतील ते पाहणं माझं काम नाही. या गोष्टींशी माझा संबंध नाही मी त्याचा विचारही करत नाही. सुनावणीत दोन्ही गटाकडून अंतिम युक्तिवाद करण्यात आला असून आता सर्व बाबी तपासून लवकरच निर्णय दिला जाणार असल्याचं नार्वेकरांनी सांगितलं आहे.