Download App

कसब्यात महाविकास आघाडी सुसाट… चिंचवडमधील तिढा मात्र सुटेना

विष्णू सानप, लेट्सअप प्रतिनिधी

पिंपरी : भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्त टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चिंचवड आणि

विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजप तथा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रणनिती आखायला सुरुवात केली आहे. भाजपकडून चिंचवड आणि कसब्यातील उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून कसब्यातील उमेदवार ठरला असून उमेदवारी अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र, चिंचवडमधील तिढा काही अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी सुरू आहेत की काय ? की कन्फ्युजन आहे. असा सवाल अनेकांना पडला आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दुसरीकडे, प्रमुख दावेदार राष्ट्रवादीचे राहुल कलाटे आणि नाना काटे दोघेही अर्ज भरणार असल्याने महाविकास आघाडीत ‘बिघाडी’ झाल्याचे पहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राज्यातील देगलूर, पंढरपूर, कोल्हापूरच्या पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या नाहीत. पण, त्यानंतरच्या पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘घड्याळ’ या चिन्हावर महाविकास आघाडीचा उमेदवार अर्ज दाखल करेल, अशी माहिती अजित पवार यांनी काल रात्री दिली होती.

याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सर्व आजी-माजी नगरसेवक आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी यांना आज मंगळवारी (ता. 7 फेब्रुवारी) अजित पवार तसेच शहरातील जेष्ठ नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत 205 चिंचवड विधानसभा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारीचा अर्ज रॅलीद्वारे दाखल करण्यात येणार आहे. असा ‘मॅसेज’ काल रात्री उशीराने केला. तर रावेत-किवळे येथील एका हॉटेलमध्ये सोमवारी रात्री पवार यांनी निवडक नेत्यांची बैठक घेतली. यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, इच्छुक उमेदवार नाना काटे, भाऊसाहेब भोईर, मयूर कलाटे आदी उपस्थित होते.

महाविकास आघाडीचा घटकपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राहुल कलाटे यांनी उमेदवारीवर दावा केला होता. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांतील खलबतानंतर कलाटे यांच्या नावावर अद्यापही शिक्कामोर्तब झाले नाही. यामुळे चिंचवडमधून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

दरम्यान, नाना काटे आणि राहुल कलाटे यापैकी कुणाला महाविकास आघाडीकडून उमेदवारीची लॉटरी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, नाना काटे, राहुल कलाटे आणि अश्विनी जगताप अशी त्रिशंकू लढत चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत पहायला मिळू शकते असंही कयास अनेकांकडून लावला जात आहे. मात्र खरं काय ते आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल.

Tags

follow us