Download App

घडाळ्याची टिकटिक आता फक्त दोनच राज्यात

NCP National Party Status Cancelled : भारत निवडणूक आयोगाने (Central Election Commission) राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसला राज्य पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. तोही दोनच राज्यात मिळाला आहे. महाराष्ट्र (Maharashtra politics) आणि नागालँड (Nagaland) या राज्यांमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविता येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा (National Party Status) गेल्याचा राष्ट्रवादीला मोठा फटका आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार राष्ट्रीय पक्षाला एकाच चिन्हावर देशभरातील निवडणुका लढविता येतात. राष्ट्रीय दर्जा असलेल्या पक्षाच्या उमेदवाराला बॅलेट पेपरवर (ईव्हीएम) फायदा मिळत असते. राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना बॅलेट पेपरवर वरचे स्थान असते. त्यानंतर राज्य पक्ष दर्जा असलेल्या उमेदवारांचे नावे असते.त्यानंतर नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवाराला आणि सगळ्याच शेवटी अपक्ष उमेदवाराला बॅलेट पेपरवर स्थान असते.

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काय गेला आहे. केवळ महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये राज्य पक्षाचा दर्जा का देण्यात आला आहे.हे सर्व निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे. चारपेक्षा जास्त राज्यातही राष्ट्रवादीला राज्य पक्षाचा दर्जा मिळेल, असे मते गेल्या काही निवडणुकीत मिळालेली नाहीत.

केजरीवालांचा ‘आप’ बनला राष्ट्रीय पक्ष, आयोगाचा अनेक दिग्गजांना धक्का

अरुणाचल प्रदेश, गोवा, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, नागालँड या राज्याच्या विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस लढते. २०१४ मध्ये अरुणचल प्रदेशमध्ये चार टक्के, गोव्यामध्ये चार टक्के मते मिळाली होती. जागा मात्र एकही मिळाली नाही. तर महाराष्ट्रात १७ टक्के मते आणि ४१ जागा मिळाल्या होत्या. तर मणिपूरमध्ये सात टक्के मते आणि एक जागा जिंकली होती. तर नागालँडमध्ये ६ टक्के मते आणि चार जागा जिंकल्या होत्या. तर २०१४ च्या लोकसभेत महाराष्ट्रात १६ टक्के मते आणि चार जागा मिळाल्या होत्या. तर अरुणाचल प्रदेशमध्ये एक टक्का मते, मणिपूरमध्ये साडेचार टक्के मते मिळाली होती.

२०१९ च्या लोकसभेत महाराष्ट्रात १५ टक्के मते आणि चार जागा जिंकल्या होत्या. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात १७ टक्के मते आणि ५४ जागा मिळाल्या होत्या. तर गोव्यात अडीच टक्के मते आणि १ जागा जिंकली होती. मणिपूरमध्ये एक टक्कापेक्षा कमी मते मिळाली होती. मेघालयात दीड टक्के, नागालँडमध्ये एक टक्का मते मिळाली होती.

२०१९ नंतर राष्ट्रवादीला लोकसभेची लक्षदीपचा एक जागा जिंकता आली आहे. २०२२ मध्ये गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने लढविली.दोन्ही राज्यात एक टक्का मते मिळाली. गेल्या महिन्यात झालेल्या नागालँडमधील निवडणुकीत राष्ट्रवादीने सात जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे नागालँडमध्ये राज्य पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी मते राष्ट्रवादीला मिळाली. त्यामुळे या राज्यात राष्ट्रवादी राज्य पक्ष राहिला आहे. दोनच राज्यात राष्ट्रवादीला राज्य पक्षाचा दर्जा मिळू शकला. त्यामुळे राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला आहे.

Tags

follow us