राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी निवडणूक (Election) आयोगाने तारीख जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून सोलापुरात महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठऱला आहे. काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मनसे आणि माकप यांच्यातील जागावाटपावर प्राथमिक एकमत झालं आहे.
Video : पुण्यातील गुंड बंडू आंदेकरसह सून अन् भावजय निवडणुकीच्या मैदानात; पक्ष कोणता?
ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला 50 ते 55 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 27 ते 29 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 17 ते 18 जागा तर माकपला 8 ते 10 जागा देण्यावर सहमती झाली आहे. मनसेसह काही जागांबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली निवड मंडळाच्या बैठकीत सोलापूरच्या यादीला मंजूर देण्यात आली आहे. त्यानुसार सोलापूर महापालिकासाठी काँग्रेस पक्षाने वीस जणांची पाहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्याच यादीत शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांची सून सीमा यलगुलवार, माजी महापौर आरीफ शेख यांच्या पत्नी सबा परवीन शेख यांचा समावेश आहे.
काँग्रेस पक्षाची प्रभागनिहाय यादी पुढीलप्रमाणे
प्रभाग क्रमांक ९ अ : दत्तू नागप्पा बंदपट्टे
प्रभाग क्रमांक ११ ड : धोंडप्पा गोविंदप्पा तोरणगी
प्रभाग क्रमांक ११ ब : सबा परवीन आरिफ शेख
प्रभाग क्रमांक १४ ब : शोएब अनिसूर रेहमान महागामी
ड) बागवान खलिफा नसीम अहमद बशीर अहमद
प्रभाग क्रमांक १५ क : चेतन पंडित नरोटे
प्रभाग क्रमांक १५ ड : मनीष नितीन व्यवहारे
प्रभाग क्रमांक १६ ब : फिरदोस मौलाली पटेल
क) सौ. सीमा मनोज यलगुलवार
ड) नरसिंग नरसप्पा कोळी
प्रभाग क्रमांक १७
अ : शुभांगी विश्वजीत लिंगराज
ब) परशुराम छोटूसिंग सतारेवाले
ड) वहिद अब्दुल गफूर बिजापूरे
प्रभाग क्रमांक २०
अ : अनुराधा सुधाकर काटकर
प्रभाग क्रमांक २१
अ : प्रतीक्षा प्रवीण निकाळजे
क) किरण शीतलकुमार टेकाळे
ड) रियाज इब्राहिम हुंडेकरी
प्रभाग क्रमांक २२
अ) संजय चन्नवीरप्पा हेमगड्डी
क) राजनंदा गणेश डोंगरे
प्रभाग क्रमांक २३
ब) दीपाली सागर शहा
