Download App

खासदार राजेंद्र गावितांचा पालघरमधून पत्ता कट? भाजपकडून ‘या’ दोन नावांची चर्चा

पालघरमधून खासदार राजेंद्र गावितांचा पत्ता कट होऊन तिथे भाजपकडून डॉ. हेमंत सावरा आणि माजी आमदार विलास तरे यांची नाव चर्चेत आहेत.

Palghar Loksabha : पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावीत (MP Rajendra Gavit ) यांचा यावेळी पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान येथून माजी मंत्री विष्णू सावरा यांचे सुपुत्र डॉ. हेमंत सावरा किंवा माजी आमदार विलास तरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. येथून उद्या 3 मे राजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. (Palghar Lok Sabha) परंतु, आणखी नाव निश्चित न झाल्याने या जागेवरून नक्की कुणाला उमेदवारी मिळते याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

 

सहा विधानसभा मतदारसंघ

येथे ठाकरे गटाने उमेदवारी दिलेली आहे. भारती कामडी यांना येथे उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे गेली अनेक दिवसांपासून त्यांचा प्रचार सुरू झाला आहे. परंतु, महायुतीचं कुणाला उमेदवारी द्यायची याचं भिजत घोंगड कायम आहे. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. पालघर लोकसभेत शिवसेनेचे राजेंद्र गावित सध्या खासदार आहेत.

 

तर गावित का भूमिका घेणार?

खासदार असताना आता त्यांचा पत्ता कट झाल्याची जोरदार चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे. तसंच, त्यांना उमेदवारी मिळणार नाही यामुळेच येथे इतक्या दिवस उमेदवाराचे नाव घोषीत करण्यात आलं नाही अशीही चर्चा आहे. त्यावर गावित यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु, जर विलास तरे किंवा डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर झाली तर गावित काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Tags

follow us