BJP politics : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशातील लोकशाही आणि स्वायत्त संस्था यांचे अस्तित्व धोक्यात आहे असा आरोप विरोधी पक्ष आणि पुरोगामी संघटनांकडून केला जातो आहे. या आरोपात तथ्य आहे का? असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रशांत दीक्षित यांना लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात विचारण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले की काही दिवसांपूर्वी EVM बद्दल लोक संशय निर्माण करत होते. पण 2014 नंतर 50 टक्के निवडणुका भाजप हारला आहे. कोर्टाचे अनेक निकाल केंद्र सरकारच्या विरोधात गेले आहेत, असे ते म्हणाले.
प्रशांत दीक्षित म्हणाले की नरेंद्र मोदींवरची सगळीच टीका चुकीची नाही आणि सगळीच टीका बरोबर आहे असं पण म्हणता येणार नाही. टीका करणाऱ्यांबद्दल एका गोष्टींची खंत वाटते की हे लोक सगळ्यांच घटनात्मक संस्थांबद्दल संशय निर्माण करत आहेत. काही दिवसांपूर्वी EVM बद्दल मोठी आरडाओरड करण्यात येत होता पण आता कर्नाटकच्या निकालाबद्दल काय म्हणणार? कर्नाटक, हिमाचलचे निकाल मॅनेज करता आले असते. भारतात कोणतीही गोष्ट मॅनेज करणं एवढं सोप नाही, असे प्रशांत दीक्षित यांनी सांगितले.
प्रशांत दीक्षित पुढं म्हणाले की सुप्रीम कोर्टावर केंद्र सरकारचा दबाव आहे असं म्हटलं जातं पण सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय केंद्र सरकारच्या विरोधात आहेत. आपल्याकडे इतकीही वाईट स्थिती झालेली नाही. 2014 नंतर 50 टक्के निवडणुका भाजप हारला आहे. अशावेळी लोकशाही धोक्यात आहे असं कसं म्हणणार? काही ठिकाणी पोलीसांचा चुकीच्या पद्धतीने वापर होतो. पण संजय राऊत यांच्या प्रकरणात कोर्टानेच ईडीला फटकारले आहे. कोर्ट ओरडू शकते आणि त्यांचं मत मान्य केलं जातं. त्यानुसार दुरुस्ती केल्या जात आहेत, असे प्रशांत दीक्षित म्हणाले.