मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. (Assembly) सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे (Thackeray group) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे विधानसभेतून बाहेर पडले. बाहेर पडल्यावर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भास्कर जाधव हे नतमस्तक झाले आणि (Maharashtra Politics) आता या सभागृहात येण्याची इच्छा नसल्याची म्हणत तिथून निघाले आहेत.
भास्कर जाधव म्हणाले की, आज मी सभागृहामधून बाहेर पडलो. उद्या गुढीपाडवा आहे, यानंतर ३ दिवस सभागृह आहे. मी गावी निघत आहे, आणि पुन्हा येणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. कारण येण्याकरिता इच्छा नसल्याचे त्यांनी सांगितलं. भास्कर जाधव एकही दिवस सभागृह चुकवत नाहीत. मात्र यंदा त्यांना जाणीवपूर्वक सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केले आहे.
मला विषय मांडू दिले जात नाही. नियमाने बोलण्याचा, सभागृह कायद्यानुसार चालवण्यासाठी मी आग्रही आहे. तसेच अधिवेशन, कामकाज नियम कायदा परंपरा, घटनेनुसार चालावे असं मला वाटते. माझ्या २ लक्षवेधी लागाव्यात यासाठी प्रयत्न करूनही एकही लक्षवेधी लागली नाही. त्यामुळे मनाला वेदना झाल्याचं त्यांनी यावेळी म्हणाले.
मला जर आज सभागृहात बोलायला दिले असतं तर महत्त्वाचा विषय मांडणार होतो. कोकणामधील रस्ते चांगले करण्याकरिता अभ्यास गट नेमा, अधिकाऱ्यांचे काळे धंदे उघड होणार हे देखील त्यांना सांगायचे होते. विदर्भ, मराठवाड्यात अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. कोकणावर मोठ्या प्रमाणात संकटे उभा आहेत. महापूर आली, चिपळूण, महाड बाजारपेठ पाण्यात बुडाली, कोट्यवधीची नुकसान झाली, आमचा शेतकरी उद्ध्वस्त झाल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात हे विषय मला सभागृहात मांडायचे होते, पण मला बोलू दिले नाही असं भास्कर जाधवांनी यावेळी सांगितलं आहे. सतत अवकाळी पावसाला सामोरे जावे लागत आहे. पिकाला भाव मिळत नाही. हमीभाव दिला जात नाही. यामुळे शेतकरी आत्महत्येला सामोरे जावे लागते. अशी वेळी कुणावरही येऊ नये. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, हीच आमची भावना असल्याचे भास्कर जाधव यावेळी सांगितले.