रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्ष चिन्ह व शिवसेना नाव हे निवडणूक आयोगाने निकाल देत एकनाथ शिंदे गटाला दिले. आता याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर कडव्या शब्दात टीका केली आहे. हा चुना लगाव आयोग आहे, सत्तेचे गुलाम आहेत. ते म्हणाले की, वरुन काय आदेश येईल त्याप्रमाणे वागणारे हे आहेत. या निवडणूक आयोगाचे वडील वरती बसले असतील पण शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केलीय हे लक्षात ठेवा. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध केला.
शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह गेल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवगर्जना यात्रेतील पहिलीच जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यसह निवडणूक आयोगावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.
‘त्या’ तोतऱ्याला खरा हातोडा झेपल का? उद्धव ठाकरेंची सोमय्यांवर टीका
निवडणूक आयोगाने ज्या तत्वानुसार शिवसेना हा पक्ष शिंदे गटाकडे सुपूर्त केला ते तत्वच खोटं आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी केलेली नाही, तर माझ्या वडिलांनी केली आहे. कदाचित तिकडं वरती निवडणूक आयोगाचे वडील बसले असतील. मात्र, ते आयोगाचे वडील असतील, माझे नाही,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर टीका केली.
Uddhav Thackeray : ढेकणं मारायला गोळीबार करायचा नाही… चिरडून टाकायची!
शिंदे गटावर टीकास्त्र
उद्धव ठाकरे यांनी आजच्या वादळी सभेत भाजपसह एकनाथ शिंदे गटावर देखील निशाणा साधला. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गट व शिंदे गट निर्माण झाला. व नुकतेच निवडणूक आयोगाने निर्णय देत शिवसेना पक्षनाव व चिन्ह शिंदे गटाला दिले. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, जे भुरटे चोर, गद्दार आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की, तुम्ही शिवसेना हे नाव चोरू शकाल, पण शिवसेना चोरू शकणार नाही. जिथे रावण आपटला तिथे मिंधे गटाचं काय? अशा शब्दात ठाकरे यांनी शिंदे गटावर देखील हल्लाबोल केला.