Rohit Pawar On Ajit Pawar : आज बारामतीमध्ये कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) आणि महायुतीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), खासदार अमोल कोल्हे, सुप्रिया सुळेंसह (Supriya Sule) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पवार साहेब आप आगे बढ़ो म्हणत रोहित पवारांनी मोदींसह (PM Modi) अमित शाहांवर (Amit Shah) देखील जोरदार हल्लाबोल केला. काही लोकं म्हणत आहे शरद पवार भटकती आत्मा आहे मात्र मला दिल्लीवाल्या नेत्याला सांगायचं आहे, शरद पवार यांची आणि लोकांची आत्मा कोणी असेल तर ते म्हणजे पवार साहेब. आज अजित पवार भाजपसोबत गेले कुटुंबातील एक सदस्य म्हणून मला वाईट वाटतो, पण तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे.
भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी पार्टी, चिन्ह आणि जागा देखील नेली. मात्र तुम्ही पवार साहेबांची जागा नेण्याचा पर्यंत केला तरी शरद पवार आमच्या ह्र्दयात आहे. गेल्या 60 वर्षात राज्यातील लोकांच्या हितासाठी पवार साहेबांनी कामे केली असं रोहित पवार म्हणाले.
शरद पवार होणे सोपे नाही, अजित पवारांना टोला
शरद पवारांनी कधी मी केलं,मी केलं असं म्हणाले नाही . मी मी म्हणणारे आज भाजपसोबत गेले आहे. दिल्लीचे नेते म्हणतात शरद पवारांना कुटुंब सांभाळता आला नाही मात्र शरद पवार यांचा कुटुंब फक्त पवार कुटुंब नाही तर संपूर्ण राज्यातील जनता शरद पवारांचा कुटुंब आहे. यामुळे शरद पवार होणे सोपे नाही.
2014 पर्यंत सत्ता शरद पवार यांच्यामुळे मिळाली त्यानंतर शरद पवार यांनी त्या नेत्यांना पदे दिली तेव्हा त्यांनी आपल्या आपल्या मतदारसंघात विकासाची कामे केली असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना टोला लावला.
पुढे रोहित पवार म्हणाले, ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्यावेळी आम्ही काही पदाधिकारी पवार साहेबांसोबत होतो. तेव्हा ते टीव्ही पाहत होते मात्र त्यांनी चेहऱ्यावर दुःख दिसू दिले नाही. यावेळी त्यांनी सांगितले तुम्ही काळजी करू नका. आपल्याला स्वाभीमानी महाराष्ट्र घडवायचा आहे.
तो पर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, पवारसाहेबांचे शब्द सांगत भरसभेत रोहित पवार रडले
तो घडवत असताना किंवा तो घडवण्यासाठी आपल्याला नवी पिढी घडवायची आहे. आणि ती नवी पिढी जबाबदारी घेत नाही किंवा त्या पिढीची जबाबदारी पेलण्याची क्षमता होत नाही, तो पर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे पवारसाहेबांचे शब्द होते. हे बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर झाले.