पवारांचा मोदींना इशारा! म्हणाले, महाराष्ट्र हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही

पवारांचा मोदींना इशारा! म्हणाले, महाराष्ट्र हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही

Sharad Pawar On Narendra Modi : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (Mahayuti) जोरदार प्रचार पाहायला मिळत आहे. दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी कोल्हापूर (Kolhapur) येथे जाहीर सभा घेत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती.

तर आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या प्रचारार्थ शरद पवार (Sharad Pawar) यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंसह काँग्रेसमधील बडे नेतेही उपस्थित होते. या सभेत बोलताना शाहू महाराज यांना जास्तीत जास्त मतांनी निवडणूक द्या असं आवाहन करत शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

शरद पवार म्हणाले, देशात सर्वच पंतप्रधानांनी देशाची गरिबी हटवण्यासाठी कामे केली मात्र आताचे पंतप्रधान राज्यात येतात आणि त्यांना दोन लोकांची आठवण प्रकर्षणाने होते. एक म्हणजे उद्धव ठाकरे आणि दुसरे शरद पवार, यांच्यावर टीका केल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसवत नाही. मोदीसाहेब, तुम्ही महाराष्ट्रात कितीदाही आलात, कितीही टीका केली.

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप, माजी मुख्यमंत्री करणार भाजपमध्ये प्रवेश? प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

तुम्ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले तरीही हा महाराष्ट्र काही बोलणार नाही मात्र ज्या दिवशी संधी मिळेल त्यादिवशी तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी आमची तयारी आहे. असं म्हणत शरद पवार यांनी मोदींवर हल्लाबोल केला.

‘योग्यतेच्या माणसांनी प्रश्न विचारला तर उत्तर देईन’ म्हणणाऱ्या अजित पवारांना रोहित पवारांचा सडेतोड उत्तर !

follow us
  • fb
  • instagram
  • youtube