लढाई मंडलिक अन् शाहू महाराजांची नाही, मोदी अन् राहुल गांधींची; फडणवीसांचा विरोधकांवर हल्ला
Devendra Fadanvis Demand For vote to Mahayuti in Kolhapur : लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींना ( PM Modi ) मत देऊया. कारण ही लढाई मंडलिक विरुद्ध शाहू महाराज किंवा माने विरुद्ध महाविकास आघाडी अशीही नाही. तर ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. तसेच आज आपण मोदींमुळे जिवंत आहोत. कारण त्यांनी आपल्याला कोविडची लस दिली. असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी कोल्हापुरच्या ( Kolhapur ) सभेत कोविड लसीचं अस्त्र बाहेर काढलं. दरम्यान सध्या राज्यामध्ये महायुतीच्या प्रचारात केंद्रीय नेत्यांच्या विशेषतः पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या एका पाठोपाठ एक सभा सुरू आहेत. यामध्येच आज कोल्हापूर मधील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठी पंतप्रधान मोदींची सभा पार पडली त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.
महाविकास आघाडीला धक्का! सकाळी शरद पवारांसोबत असलेला नेता भाजपच्या वाटेवर
फडणवीस म्हणाले की, ही लढाई मंडलिक विरुद्ध शाहू महाराज किंवा माने विरुद्ध महाविकास आघाडी अशीही नाही. तर ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. तसेच कोल्हापूरच्या जनतेने ठरवला आहे की मान गादीला देऊ आणि मत मोदीला देऊ. तसेच आपण प्रभू श्रीरामांना मानणारे लोक आहोत. ज्याप्रमाणे श्रीरामांच्या हातात धनुष्य आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांकडे देखील धनुष्य आहे.
Devendra Fadnavis On Sharad Pawar: मोदीजी शरद पवारांसाठी धोका, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात
तर युती असल्याने कोल्हापुराने हातकणंगलेमध्ये मोदींच्या हातातही धनुष्यबाण आहे. त्यामुळे मंडलिक आणि मानेंना दिलेलं मत हे मोदींना दिलेलं मत आहे. तसेच महायुतीचे सरकार असताना कोल्हापूरला टोलमुक्त करण्यात आलं होतं. मात्र महाविकास आघाडीने टोल लावला.एक काळ असा होता की, देशात बॉम्बस्फोट झाल्यानंतर पंतप्रधान अमेरिकेकडे जाऊन पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी विनम्र करायचे.
मात्र मोदी यांनी पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी सर्जिकल आणि एअर स्ट्राईक केले. तसेच कोविडच्या काळामध्ये देखील जगभरात भारतामध्ये सर्वाधिक लोक मृत्युमुखी पडतील अशी चिंता व्यक्त केली जात होती. त्यावेळी मोदी यांनी देशातील शास्त्रज्ञांना कोविडची लस विकसित करण्यास सांगितलं. ज्यामुळे देशभरातील लोक जिवंत राहिले. त्यामुळे यावेळी पंतप्रधान मोदी यांना अनेक गोष्टींसाठी मतदान करायला पाहिजे मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपण जिवंत आहोत ते पंतप्रधान मोदी यांच्यामुळे त्यांनी कोविडमध्ये आपल्याला लस दिली. असं म्हणत फडणवीसांनी लोकांना महायुतीला मत देण्याचं आवाहन केलं.