‘योग्यतेच्या माणसांनी प्रश्न विचारला तर उत्तर देईन’ म्हणणाऱ्या अजित पवारांना रोहित पवारांचा सडेतोड उत्तर !

‘योग्यतेच्या माणसांनी प्रश्न विचारला तर उत्तर देईन’ म्हणणाऱ्या अजित पवारांना रोहित पवारांचा सडेतोड उत्तर !

Rohit Pawar On Ajit Pawar : बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात यावेळी पवार विरुद्ध पवार (Pawar Vs Pawar) लढत होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात राजकारण चांगलेच तापले आहे. प्रचारादरम्यान शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे.

यातच महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार ध्वजारोहन कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) टीका करत विविध विषयांवर भाष्य केले. कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या आई सुनंदा पवार (Sunanda Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी बारामती मतदारसंघात धनशक्तीचा वापर सुरू असल्याचा आरोप केला होता.

यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता यावर बोलताना अजित पवार म्हणाले, ‘कोणी काय बोलावं ते त्यांच्याकडे. मी त्यांना उत्तर देण्यास बांधील नाही. आमच्या योग्यतेच्या माणसांनी विचारलं असेल तरच मी बोलेन, असं अजित पवार म्हणाले होते. तर आता आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या या वक्तव्याचा कडक शब्दात समाचार घेत तुमचा प्रचार केला तेव्हा आम्ही योग्यतेचे होतो? असा प्रश्न विचारला आहे.

रोहित पवार यांनी एक्सवर ट्विट करत अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. या ट्विटमध्ये अजित पवार म्हणाले, बारामतीत दहशतीचं वातावरण असल्याच्या आईच्या वक्तव्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारताच ‘योग्यतेच्या माणसांनी प्रश्न विचारला तर उत्तर देईन’ असं अजितदादा म्हणाले.

मोदींविरोधात निवडणूक लढवणार ‘हा’ कॉमेडियन! म्हणाला, राजकारणात कॉमेडी म्हणून मी …

बरोबर आहे दादा तुमचं स्वतःच्या अंगावर आलं की भलतीकडं ढकलण्याचा तुम्हाला भाजपाचा संगतगुण लागलाय. आजवर तुमचा प्रचार केला त्यावेळी आम्ही योग्यतेचे होतो पण आज नाही. मिर्चीवाले… महाराष्ट्र सदनवाले… सिंचनवाले… एकाच वेळी दोन-दोन घरं सांभाळणारे… आदिवासी विद्यार्थ्यांच्या दुधातली मलई खाणारे.. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं जेवणाचं ताट पळवणारे… हे मात्र तुमच्या लेखी ‘योग्यते’चे आहेत. असं म्हणत रोहित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube