Download App

Mamata Banerjee : विरोधकांना झटका, ‘त्या’ निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जींनी केली मोठी घोषणा

Mamata Banerjee : केंद्रातील सत्ताधारी भाजपविरोधात (BJP) सर्व विरोधकांना एकत्र आणून मोठी शक्ती उभी करण्याच्या प्रयत्नांना जोरदार झटका बसला आहे. हा झटका तृणमूल काँग्रेसच्या (TMC) अध्यक्षा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी दिला आहे. बॅनर्जी यांनी एकला चलो रे चा नारा दिला आहे.

हे सुद्धा वाचा : Sharad Pawar : सरकार बदलण्याचा देशाचा मूड, शरद पवारांचं मोठं विधान 

बंगालमधल्या सागरदिघी मतदारसंघात निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला. तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. सत्तेत असतानाही पराभव झाल्याने बॅनर्जी विरोधकांच्या निशाण्यावर आल्या. विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत भूमिका स्पष्ट केली.

यावेळी बॅनर्जी म्हणाल्या,की निवडणुकीत विजय पराजय सुरुच असतात. मात्र, या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये अनैतिक युती झाली होती. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. भाजपने आपली काँग्रेसकडे वळविल्याचाही आरोप बॅनर्जी यांनी केला. भाजपने या निवडणुकीला जातीय रंग दिला. पण, काँग्रेस आणि माकपा या दोन पक्षांनीही राजकारण केले. या निवडणुकीत काँग्रेसने भाजपकडून मदत घेतल्याने आता काँग्रेसने स्वतःला भाजपविरोधी म्हणणे बंद केले पाहिजे असे बॅनर्जी म्हणाल्या.

काउ हग डे वरून ममता बॅनर्जींचा केंद्रातील सरकारवर हल्लाबोल; म्हणाल्या, जर गायीने धडक दिली तर

यानंतर बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली. त्या म्हणाल्या, की 2024 मध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढणार आहे. आम्ही लोकांच्या पाठिंब्यावर निवडणुका लढू आणि जिंकू असा विश्वास बॅनर्जी यांनी व्यक्त केला.

दरम्यान, बॅनर्जी यांनी भाजपविरोधात देशभरात विरोधकांची ताकद उभी करण्यासाठी पुढाकार घेतला होता. आता मात्र त्यांनी अशी घोषणा केल्याने काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांचे टेन्शन मात्र वाढणार आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज