Download App

दिंडोरीच्या आश्रमात वाल्मिकचा मुक्काम, सीआयडी पण तिथं गेली होती : तृप्ती देसाईंचा नवा बॉम्ब

पुणे : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि विष्णू चाटे (Vishnu Chate) हे 15 आणि 16 डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमधील आश्रमात मुक्कामाला होते. 17 तारखेला ते तिथून निघाले. बीड आणि अहिल्यानगरपासून नाशिक जिल्हा जवळ आहे. महाराष्ट्रात या प्रकरणावरुन एवढा गोंधळ सुरू असताना पोलीसांना हे आरोपी कसे सापडले नाहीत? सोबतच त्यांना जर इथल्या आश्रम प्रमुखांनी आश्रय दिला असेल तर सीआयडी आणि एसआयटी अधिकाऱ्यांनी याची चौकशी करायला हवी, अशी मागणी करत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी ही संतोष देशमुख हत्या प्रकरणात एन्ट्री घेतली आहे. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या. (Trupti Desai has made serious allegations against Valmik Karad and Vishnu Chate.)

सीआयडीचे पथकही गेले होते दिंडोरीला :

यावेळी देसाई यांनी वाल्मिक कराड मुक्कामी असलेल्या ठिकाणी सीआयडीचे पथकही गेले होते, असा बॉम्ब फोडला. जेव्हा वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर करणार होता. त्याच्या दोन ते तीन दिवस आधी सीआयडीचे पथक त्या आश्रमात गेले होते. तिथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वाल्मिक कराड दिसून आला होता. पण हे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्हीची माहिती का दिली नाही? असा सवाल करत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला का, याचा तपास गृहमंत्र्यांनी केला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. तसंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांत वाल्मिक कराड यांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंध आहेत. असे असताना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पाठीशी घालत आहेत. फडणवीस हे मुंडे यांचे जिवलग मित्र आहेत.त्यामुळे हा तपास सरळ मार्गी कसा होईल, असे म्हणत देसाई यांनी तपासावर संशय व्यक्त केला.

मोठी बातमी! वाल्मिक कराडचा पाय खोलात; विष्णू चाटेनी दिली खळबळजनक कबुली

लैंगिण शोषणाचेही आरोप :

तृप्ती देसाई यांनी आश्रम प्रमुखांवर लैंगिण शोषणाचेही आरोप केले. त्या म्हणाल्या, या आश्रमात काही चुकीचे प्रकार घडत होते. त्याबाबत माझ्याकडे काही तक्रारी आल्या आहेत. या महिलांनी आश्रम प्रमुख आण्णासाहेब मोरे उर्फ गुरुमाऊली यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या संदर्भात जानेवारी 2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक लावली होती. पण वाल्मिक कराडने या प्रकरणांमध्ये मध्यस्थी करून ते दाबण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकाराबाबत माझ्याकडे काही पुरावे आलेले आहेत. पेनड्राईव्ह उघडल्यानंतर अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे उघड होणार आहे. यात आणखी काही पुरावे हातात आल्यानंतर याबाबत मी पत्रकार परिषद घेणार आहे, असा दावाही यावेळी त्यांनी केला आहे.

follow us