Download App

झेंडा कपाळावर लावून फिरू का? ट्विटरवरून राष्ट्रवादीचा फोटो हटवल्याच्या प्रश्नांवर अजितदादा संतापले

  • Written By: Last Updated:

गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. त्यात आज सकाळपासून अजित पवार ४० आमदार घेऊन बाहेर पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या सोशल मीडियाच्या कव्हरवरून कव्हर फोटो डिलीट केल्याची सकाळी चर्चा सुरु झाली. त्यावर अजित पवार यांनी स्वतः उत्तर दिले आहे.

काय चर्चा सुरु झाली?

अजित पवार यांच्या फेसबुक आणि ट्विटरवरील कव्हर फोटो डिलीट केल्याचं दिसत आहे. त्यामुळे अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडियावरून राष्ट्रवादी हटवल्याची चर्चा रंगली आहे. पण असं असलं तरी त्याच्या ट्विटर बायोमध्ये मात्र अजूनही पक्षाच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे नक्की काय घडतं आहे, हे सांगणं अवघड झालं आहे.

अफवांना विराम ! मी राष्ट्रवादीमध्येच राहणार, अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

अजित पवार यांनी उत्तर दिल?

अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आणि भाजपसोबत जाणार, अश्या सगळ्याच प्रश्नांना अजित पवार यांनी आज उत्तर दिली. त्या दरम्यान त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या कव्हर फोटो हटवल्याबद्दल देखील त्यांनी उत्तर दिलं.

यावर बोलताना ते म्हणाले की, “एक ट्वीट दाखवायला सुरुवात केली आहे. अजित पवार यांच्या ट्वीटरवरुन पक्षाचे चिन्ह हलवले माझ्या ट्वीटमध्ये उपमुख्यमंत्री असताना दाखवलं ते उपमुख्यमंत्री पद गेल्यावर काढले बाकीचे आहे तसे आहे. त्यातून गैरसमज करुन घेतला गेला.”

अजित पवारांमुळं ‘आयाराम’ भाजप नेत्यांमध्ये चलबिचल!

झेंडा काय कपाळावर लावून फिरू का?

तुम्हीच म्हणता झेंडा काढला… ‘झेंडा काय कपाळावर लावून फिरू का?’ असा थेट सवाल त्यांनी विचारला. ‘अरे बाबांनो…’ध’ चा ‘मा’ करु नका ना… जर काही झाले तर मीच सांगेन ना तुम्हाला… दुसर्‍या कुणाच्या ज्योतिषाची गरज नाही आणि दुसरीकडून बातम्याही काढायची गरज नाही. असा खोचक टोला त्यांनी माध्यमांना लगावला आहे.

ते पुढे म्हणाले की, “आमच्या मनात असा कुठलाही विचार नाही, चर्चाही नाही. कुणीतरी बातम्या पेरण्याचे काम विघ्नसंतोषी लोक करत असतील मी माझ्या पक्षाचे म्हणत नाही. माझ्याबद्दल आकस असणारे माझ्या पक्षात कुणी नाही पक्षाबाहेरचे आहेत.”

Tags

follow us