Download App

फडणवीसांच्या ‘सो कॉल्ड’ तत्वांना मलिकांनी दाखवली केराची टोपली; अंबादास दानवेंचा हल्लाबोल

आज मलिकांनी घड्याळ चिन्ह दाखवून मुख्यमंत्र्यांचा आणि फडणवीस यांच सो कॉल्ड तत्व निव्वळ केरात घातले- अंबादास दानवे

  • Written By: Last Updated:

Ambadas Danve : दीड वर्ष तुरुंगास भोगून जामीनावर बाहेर आलेल्या राष्ट्रवादी आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अखेर आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यावरून आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी (Ambadas Danve ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) जोरदार टीका केली.

राजकुमार हिरानी ते मोजेझ सिंग ‘या’ दिग्दर्शकांनी भारतीय चित्रपटाचा केला कायापालट 

 

काल मलिक यांनी एक ट्विटरपोस्ट केली होती. त्या पोस्टसोबत जोडलेल्या फोटोत नवाब यांनी  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत निवडणूक चिन्ह घड्याळ लावले होते. त्याबाबत दानवे यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, नवाब मलिकांनी आपल्या नावासह घड्याळ घालून ते कोणासोबत आहेत, हे जगजाहीर केलं. ‘दाऊद सोबत बसणाऱ्या सोबत आम्ही राहू शकत नाही..’ असं घसा कोरडा पडेपर्यंत मुख्यमंत्री शिंदे ओरडत होते…. दुसरीकडे सुपर सीएम फडणवीस यांनी आपलं ‘तत्व’सांगायला पत्ररुपी स्वस्त पब्लिसिटीचा आधार घेतला होता. आज मलिकांनी घड्याळ चिन्ह दाखवून मुख्यमंत्र्यांचा आणि फडणवीस यांच सो कॉल्ड तत्व निव्वळ केरात घातले आहेत. यावर हे दोघे काही बोलले नाहीत तर ते जनतेकडून खोटारड्यांचे मुकुटमणी म्हणवले जातील, असा हल्लाबोल दानवेंनी केला.

‘संतांच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही’, महंत रामगिरी महाराजांसमोर शिंदेंची ग्वाही 

मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने 23 फेब्रुवारी 2022 रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. दरम्यान, मलिक हे जामीनावर सुटून आल्यानंतर फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांचा महायुतीत समावेश करणे योग्य होणार नाही, असे म्हटले होते. तेव्हापासून राष्ट्रवादीने मलिक यांना दूरच ठेवलं होतं.

 

दरम्यान, आता मलिक यांनी आता एका पोस्टमध्ये घड्याळाचे चिन्ह वापरलं. त्यामुळे ते अजित पवार यांच्या गटासोबत असल्याचे स्पष्ट झालं. मात्र, फडणवीसांची अद्याप यावर कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळं दानवेंनी फडणवीस काही बोलले नाहीत तर ते जनतेकडून खोटारड्यांचे मुकुटमणी म्हणवले जातील, असा हल्लाबोल केला. दानवेच्या या टीकेला फडणवीस काय प्रत्युत्तर देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us