Download App

तुमचं मोहोळ फक्त टोलनाक्यावर दगड मारण्यासाठी अन् घेतलेल्या सुपाऱ्या…; अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर

शिवसेनेला मनोज जरांगेच्या आडून राजकारण करण्याची गरज नाही. त्यांचे मोहोळ फक्त टोलनाक्यावर दगड मारण्यासाठी असतं.

  • Written By: Last Updated:

Ambadas Danve on Raj Thackeray : बीडमधील ठाकरे गटाच्या आंदोलनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवा (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. जरांगेच्या आडून ठाकरे आणि पवारांचं राजकारण सुरू असल्याची टीका राज ठाकरेंनी केली. त्या टीकेला आता ठाकरे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिलं.

राज ठाकरेंकडून अपरिपक्व वक्तव्य, फ्रस्ट्रेशनमधून आरोप, सुषमा अंधारेंचा प्रत्युत्तर 

शिवसेनेला मनोज जरांगेच्या आडून राजकारण करण्याची गरज नाही. त्यांचे मोहोळ फक्त टोलनाक्यावर दगड मारण्यासाठी असतं, हे मोहोळ सुपाऱ्या वाजवण्यासाठी असतं, असा खोचक टोला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी लगावला.

राज ठाकरे काय म्हणाले होते?
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं राजकारण सुरू आहे. माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला. शिवाय, माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर तुम्हाला सभाही घेता येणार नाही, माझी पोरं काय करतील हे सांगता येत नाही, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला. त्यावर दानवे यांनी प्रत्युत्तर दिले.

Bigg Boss Marathi: भाऊच्या धक्क्यावर रितेशने केली जान्हवीची बोलती बंद 

दानवेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले, शिवसेनेला जरांगेच्या आडून राजकारण करण्याची गरज नाही. उलट आरोप आम्हालाही करता येतो. तुम्हीच भारतीय जनता पक्ष आणि आमच्यातून गेलेले शिंदे गट यांच्या आडून सर्व राजकारण करत आहात, असं आम्ही म्हणायचं का? हा माझा सवाल आहे. ज्या गावच्या बाभळी असतात, त्याच गावच्या बोरी असतात. हे मोहोळ फक्त टोलनाक्यावर दगड मारण्यासाठी असंत. हे मोहोळ सुपारी वाजवण्यासाठी असतं, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, असा टोला दानवेंनी लगावला.

पुढं दानवे म्हणाले की, मनोज जरांगेंच्या आडून आमचं राजकारण सुरू आहे, हे राज ठाकरेंनी प्रुफ करावं. असले धंदे शिवसेना तर कधीच करणार नाही. अजित पवार यांनी जातीचं राजकारण केलं नाही, हा साक्षात्कार यांना आत्ता झाला. तुमच्या मागील भूमिका तुम्ही पाहिल्या तर मला वाटतं की आपल्याला स्पष्टीकरण मिळेल. आम्ही फार काही सांगावे, अशातला मुळीच भाग नाही, असंही दानवे म्हणाले. .

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
सुषमा अंधारे म्हणाल्या, राज ठाकरे हे एका अर्थाने राजकारणातून चर्चा बाह्य होत असले तरी त्यांच्याकडून मला धीर गंभीर व प्रगल्भ प्रतिक्रियांच्या अपेक्षा आहे. मराठवाड्यामध्ये त्यांना आंदोलकांनी ठिकठिकाणी त्यांचा रस्ता अडवला, त्या फ्रस्ट्रेशनमधून त्यांनी कदाचित असं वक्तव्य केलं असेल, अशी टीका अंधारेंनी केली.

follow us